Details
नाट्यरंग–भक्तिरंगाने श्रोते भारावले!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाट्यसंगीत हा कार्यक्रम थोडा वेगळ्या रितीने व्हावा, यासाठी संगीत नाटकातील नाट्यपदांबरोबर भक्तीगीतांचाही समावेश करणारा नाट्यरंग-भक्तिरंग हा अनोखा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
निमिष कैकाडी, शर्वरी नागवेकर, मानसी फडके, धनंजय म्हसकर या उदयोन्मुख गायक कलाकारांबरोबर सोजी मॅथ्यू ही वयाने लहान असलेली गायिकाही सहभागी झाली होती. सर्वच कलाकार अतिशय तयारीने गायले. नेहमीपेक्षा वेगळ्या, विस्मृतीत गेलेल्या, संगीत नाटकातल्या पदांची निवड केल्यामुळे ही नाट्यपदं ऐकणे ही श्रोत्यांसाठी खास पर्वणी होती. साथीला असणारे कलाकारही आनंद घेत, समरसून साथसंगत करत होते. त्यामुळे प्रत्येक नाट्यपदाचं उत्तमप्रकारे सादरीकरण होत होतं. ऑर्गन- निरंजन लेले, संवादिनी– श्रीरंग परब, तबला– प्रसाद पंडित, पखवाज– अनिल गावडे, साईड रिदम– महेंद्र शेडगे यांनी त्यांना उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन घनःश्याम दीक्षित यांनी केले. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून साथ दिली.”
“केएचएल न्यूज ब्युरो