HomeArchiveनक्षलवाद्यांना ठेचणे हीच...

नक्षलवाद्यांना ठेचणे हीच खरी श्रद्धांजली!

Details
नक्षलवाद्यांना ठेचणे हीच खरी श्रद्धांजली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
आनंद आणि अभिमानाने मन उचंबळून येत असतानाच काहीतरी अतिव दु:खद, मन विदीर्ण करणारी, हतबलता वाढवणारी बातमी कानावर यावी असे अनेकदा घडून येते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या मंगल दिनी सगळी निराशा बाजूला सारून काहीतरी चांगले नक्कीच घडेल ही उमेद घेऊन नागरिक कामाला लागले आणि दुपार उजाडायच्या आतच गडचिरोलीतील नक्षलवादी घातपाताची बातमी आली. १५ जवानांचे संसार कायमचे उजाडणारा भूसुरूंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना शोकग्रस्त केले आणि त्याचवेळी राज्याच्या सुरक्षा यंत्रणेची, गृह विभागाची, गुप्तचर यंत्रणेच्या सुस्त, निद्रिस्त कारभाराचीही लक्तरे काढली. जवानांच्या गाडीबरोबर या ढिलाईच्याही चिंधड्या उडाल्या. याच गडचिरोलीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील नव्हे राज्यातील सर्वाधिक मतदान 72.2 टक्के नोंदवले गेले होते. निवडणुकीच्या काळात माओवादी हिंसक घातपातासाठी जय्यत तयारीत होते. मात्र गडचिरोलीतील पोलीस आणि सुरक्षा पथकांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात, जंगल भागात सुरक्षा पथकांनी एकूण 15 हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. परिणाम मतदानात दिसून आला.

नक्षलवाद्यांचे बहिष्काराचे आवाहन झुगारून मतदारांनी बुलेटऐवजी बॅलेटवर विश्वास व्यक्त केला. बुलेटऐवजी बॅलेट हे बोलायला ठीक असते. पण खवळलेल्या नक्षलवाद्यांनी नेमकी महाराष्ट्राच्या स्थापनादिनीच संधी साधली. मतदानप्रक्रिया खंडित करण्यासाठी दुर्गम भागातील जंगलांतून जाणाऱ्या रस्त्यांवर, वाटांवर भूसुरूंग पेरले होते, आयडी बॉम्ब लपवले होते. काही ठिकाणी स्फोटही झाले. पण मतदान पार पडले, उत्तम टक्केवारीने पार पडले. यामुळे सुरक्षायंत्रणा काहीशा बेफिकीर झाल्या असतानाच नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ त्यांनी हा भूसुरूंग स्फोट घडवला. मंगळवारी रात्रीच कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये त्यांनी जाळली होती. हा सापळा लावला होता. ते त्याच परिसरात वावरत होते. ही खबर मिळाल्यावर सुरक्षापथके या जाळपोळीमुळे धावून येणार हे नक्की होते. पण हा सापळा लक्षात न आलेले जलद प्रतिसाद पथकातील जवान बेसावध राहिले. खासगी वाहनाने ते निघाले असताना जांभूरखेडा गावाजवळील पुलावर भूसुरूंग स्फोट घडवून माओवाद्यांनी मतदान उत्तम झाल्याचा सूड उगवला.

या सुरक्षापथकांवर त्यांची नजर होती आणि ते जाणार असलेल्या मार्गावर म्हणूनच त्यांनी सुरूंग पेरून घातपाती हल्ला यशस्वी केला हे उघड आहे. पोलीस आता तिथे शोधाशोध करत आहेत. पण माओवादी कधीच फरारी झाले आहेत. आता सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती नक्षलींना कशी मिळाली, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रथेनुसार हल्ल्यातील बळींबद्दल पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि आणखी काही नेत्यांनी दु:ख, संताप व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांना सोडणार नाही, कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, अशी टिवटिवही झाली आहे. या सगळ्याचे राजकारणही सुरू झाले आहे. ‘गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही’, असा टोला शरद पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

राजकारण जरी बाजूला ठेवले तरी, याच नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याचे आणि गडचिरोली आणि दंडकारण्य परिसर माओवाद्यांच्या प्रभावातून मोकळा होत असल्याचे गेले वर्षभर सांगण्यात येत आहे. मग हे नक्षलवादी कुठून आले? गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात कायदा व सुव्यवस्थेचे, माहिती देणाऱ्या खबऱ्यांच्या नेटवर्कचे काय झाले? या प्रश्नांना कोण उत्तरे देणार? बळी गेलेल्या कमांडोंना शहीदांचा दर्जा तरी मिळणार का? या प्रश्नाचे उत्तरही त्यांच्या कुटुंबियांना हवे आहे. पण देश, सत्ताधारी, विरोधी पक्ष, नेते-पुढारी, मंत्रीसंत्री सर्वच लोकशाहीच्या उत्सवात, मते मिळवण्याच्या स्पर्धेत मग्न आहेत. सत्तेसाठी भांडत आहेत आणि लोकशाहीच्या बळकट स्तंभाला पोखरणारी नक्षलवादाची, माओवादाची वाळवी मोकाट सुटली आहे. मध्यंतरी शहरी नक्षलवाद्यांचा, नक्षलवादी समर्थकांची धरपकड करत सरकारने पाठ थोपटून घेतली होती. या सगळ्याचे पुढे काय झाले? याचेही उत्तर सरकारने द्यावे. आम्ही शोषितांच्या बाजूने, त्यांच्या हक्कांसाठी लढतो, असे नक्षलवादी नेहमी सांगतात. पण प्रत्यक्षात याच शोषितांचे शोषण करतात, त्यांना दहशतीखाली ठेवतात, मृत्यूदंड देतात, अत्याचार करतात.

मूळची नक्षलवादी चळवळ उद्दीष्टांपासून कधीचीच भरकटली आहे. तिला निष्प्रभ करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992मध्ये विशेष कृती दलाची अर्थात सी-६० दलाची स्थापना केली होती. या दलात स्थानिक आदिवासींना भरती करण्यात आले होते. स्थानिकांची भरती केल्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींची खबर अधिक वेगाने मिळू लागली, स्थानिक भूभागाची माहिती असलेल्या या जवानांमुळे सुरक्षा पथकांच्या हालचाली जलद होऊ लागल्या. या जवानांना नाऊमेद करण्यासाठी नक्षलवादी असे हल्ले करू लागले आहेत. बुधवारी शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलातील या जवानांमधील बहुतेकजण याच भागातील होते, कुरखेडा तालुक्यातीलच होते. याचाच अर्थ स्थानिकांची भरती करूनही नक्षलवादाची विषवल्ली पूर्णपणे नष्ट झालेली नाही. ती ठेचायची खरीखुरी इच्छाशक्ती सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना दाखवावीच लागेल. या शहीदांना श्रद्धांजली वाहताना हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content