HomeArchiveधावत्या रेल्वेत आलेला...

धावत्या रेल्वेत आलेला आकस्मिक मृत्यू व पुढे..

Details
धावत्या रेल्वेत आलेला आकस्मिक मृत्यू व पुढे..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरीट सोमैय्या, माजी खासदार
[email protected]
गुरूवार, दि. 13 जून, 2019 रोजी ठीक सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास मला माझ्याच सहकाऱ्याकडून, दिगंबर प्रभू यांच्याकडून एक संदेश मिळाला. ते त्यावेळी चालत्या ट्रेनमधून प्रवास करत होते.

“डी. संथानम हे दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन गुलबर्गा स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच चालत्या ट्रेनमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. कृपया, त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ मदत पोहोचवा.”

मी लगेचच दिगंबर प्रभूंशी संपर्क केला व संपूर्ण समस्या जाणून घेतली. ते स्वत: एक नाटककार आहेत व मुलुंड पूर्व मुंबई येथील निवासी आहेत. दिगंबर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संथानम आपल्या कुटुंबासमवेत प्रवास करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यूमुखी पडले. चालत्या ट्रेनमुळे त्यांना काही मदत मिळाली नाही. परंतु ट्रेन गुलबर्गा स्टेशनवर पोहोचताच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यांचे कुटूंब या धक्क्यातून स्वत:स सावरू शकत नव्हती. पुढे काय करावे याचीही योग्य माहिती त्यांना नव्हती.

दिगंबर यांच्याकडून पूर्ण माहिती कळताच मी त्वरित महत्त्वाच्या व्यक्ती जसे की, रेल्वे मंत्रालयातील अधिकारी, डी.आर.एम.- सी.एस.एम.टी. (मुंबई) व माझे दिल्ली सहाय्यक पंकज बिश्त यांच्याशी संपर्क करून पूर्ण कल्पना दिली. याचबरोबर माझे इतर सहकारी सहाय्यक जसे मुंबई येथील जितेश मतालियाव, महेंद्र जैन, जे रेल्वे प्रवासी संघांशी संबंधित आहेत, त्याचबरोबर नरेंद्र पाटील, रेल्वे मंत्रालयातील पियूष गोयल यांचे कार्यालय, संजय जैन, डी.आर.एम. सी.एस.एम.टी., डॉ. उमेश यादव, खासदार गुलबर्गा यांच्याशीही संपर्क केला.

काही क्षणातच संजय जैन यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व मला सांगितले की, हितेंद्र मल्होत्रा हे डी.आर.एम., सोलापूर व गुलबर्गा विभागाचे सर्वेसर्वा असून त्यांना मी आताच संथानम यांच्या कुटुंबाला आवश्यक ती लागणारी सर्व मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. अशा दुख:द प्रसंगी त्यांची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी पूर्ण पाडल्याची खात्री करून दिली.

दुखा:त असलेल्या संथानम यांच्या कुटुंबाशीही मी संपर्क साधला. पूर्ण घटना हृदयाला चटका देणारी होती. रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी संथानम यांचे पार्थिव आपल्या ताब्यात घेतले होते. नियमानुसार अधिकाऱ्यांनी संथानम यांच्या कुटुंबियांना याची जाणीव करून दिली की, पार्थिव जवळच्याच इस्पितळात शवविच्छेदनासाठी न्यावे लागेल. परंतु, कुटुंबियांनी मात्र यास स्पष्ट नकार दिला, असे मला रेल्वे अधिकाऱ्यांकडून कळले. यावर मी स्वत:च कुटुंबियांशी संपर्क केला व त्यांना असा सल्ला दिला की, त्यांनी तेथील वैद्यकीय व पोलिसांना आवश्यक त्या सर्व कामास मदत करावी. खास करून, शवविच्छेदनास कोणताही अडथळा आणू नये.

मी सोलापूरचे डी.आर.एम. हितेंद्र मल्होत्रा यांनाही सांगितले की, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करा. जर तेथील तुमचे वरिष्ठ अधिकारी जागेवर नसतील तर किमान त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधावा व रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलिस (GRP) आणि रूग्णालय यांच्याशी समन्वय साधण्यास सहकार्य करावे. यावर काही कालावधीतच हितेंद्र मल्होत्रांनी मला सांगितले की, मी म्हटल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून पुढची सर्व प्रक्रिया त्वरित चालू केली जाईल.

दुपारी ठीक 12.30 वाजता मला संथानम यांच्या कुटुंबियांनी संपर्क करून सांगितले की सर्व मदत मिळू लागली आहे. इस्पितळातील सर्व सूत्रे हलू लागली आहे. तेथील स्थानिक बी.जे.पी.चे मंत्री डॉ. उमेश यादव यांचे कार्यकर्तेही सातत्याने मदत करत आहेत. अन्य सर्व औपचारिकता कोणत्याही अडथळाविना पूर्ण होत आहेत. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वत: बी.जे.पी.चे मंत्री (गुलबर्गा) व त्यांचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांनीही खूप मदत केली. रेल्वे अधिकाऱ्यांनीही कुटुंबियांना पार्थिव मुंबईपर्यंत आणण्यासाठी आवश्यक शववाहिनीची सोय करून दिली. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मी दिगंबर व संथानम यांच्या कुटुंबियांशी संपर्क केल्यावर कळले की, ते प्रवासात आहेत व पार्थिव मुंबईला पोहोचेपर्यंत रात्र होईल.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व कुरियरच्या माध्यमातून पोहोचवली जातील. यामुळे कुटुंबियांचा आवश्यक असा 2 तासांचा वेळ वाचला व कुटूंबीय आपला प्रवास लवकर सुरू करू शकले.

रात्री 12.30 ला मुंबईच्या चेकनाक्यावर पोहोचताच कुटुंबियांनी दाहसंस्कारसंबंधीची आवश्यक अशी अनुमती मुलुंड पश्चिम पोलिसांना केली. पण यावेळी आवश्यक त्या सत्यप्रती असणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली गेली. त्यांच्या कुटुंबियांनी सर्व परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर इतर आवश्यक कागदपत्रेही आम्हाला व्हॉट्सअॅप व कुरियरच्या माध्यमातून येणार आहेत. मी तिथे उपस्थित नसल्याने माझ्या अनुपस्थितीत दिगंबर यांनीही पोलिसांना सर्व परिस्थिती समजावली. पोलिसांनाही समजुतीने घेऊन आवश्यक ती संवेदनशीलता दाखवली व ‘दाहसंस्कारच्या’ सर्व अनुमती केवळ काही क्षणात देऊन टाकल्या.

रेल्वे पोलिस अधिकारी, दिगंबर प्रभू व संजय जैन तसेच संथानम यांच्या कुटुंबियांच्या मदतीमुळेच केवळ 24 तासात संथानम यांचे पार्थिव गुलबर्गा येथून मुंबईत आणता आले व अंतिम संस्काराचा विधी वेळेवर करता आला. अशी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये अशी इच्छा व्यक्त करतो. ईश्वर संथानम यांच्या आत्म्यास शांती देवो.

यासंबंधित घटनेवरून मला केवळ एवढेच प्रतित करायचे आहे की, अशा दुर्देवी घटना मानावी जीवनात घडत राहतात. या मनाला त्रास देणाऱ्या, सहन न होणाऱ्या, मनाला धक्का देणाऱ्या असतीलही. परंतु, अशावेळी शांत व विवेकबुद्धीने विचार करूनच अशा समस्या हाताळाव्यात.
लक्षात ठेवण्याचे मुद्दे
o अधिकारी पार्थिव केवळ अगदीजवळच्या नातेवाईकांनाच दिले जाईल असे सूचित करतील.
o ज्यावेळी एखादा अनैसर्गिक मृत्यू होतो तेव्हा शवविच्छेदन हे अतिशय महत्त्वाचे व अतिशय योग्य प्रक्रिया मानली जाते.
o कायद्यात्मक प्रक्रियाही अतिशय महत्त्वाची आहे.
o कुटुंबियांसाठीही शवविच्छेदनाची प्रक्रिया अतिशय बचावात्मकतेचा आधार बनू शकते, ज्यावेळी कुटुंबातील अथवा नात्यातीलच लोक मृत्यूबाबत साशंकता व्यक्त करतात.
o ‘आयुष्य विमा’च्या आवश्यक कागदपत्रांतही शवविच्छेदनाचा अहवाल अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
o एखाद्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनेत (ती घटना चालत्या ट्रेनमध्ये झाली तरी) रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP), स्थानिक पोलीस, रेल्वे परिचारक, रेल्वे स्टेशन मास्टर, रेल्वे सिव्हील हॉस्पिटल यांच्याशी संपर्क करणे व आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरते.
o अशा घटनेत बऱ्याच रूग्णवाहिका दिल्या जातात. पण, शववाहिनीचा वापर करणे योग्य होय.
o अशा घटनेत अंतिम संस्काराच्या वेळी सिव्हिल हॉस्पिटल, प्राथमिक अहवाल (शवविच्छेदनाचा), पोलीस अहवाल (जेथे अपघात किंवा घटना घडली) आणि रेल्वेचा अहवाल याच्या सत्यप्रती दाखवाव्या लागतात.
o स्थानिक पोलीस तेव्हाच ‘अंतिम संस्काराची’ मुभा देतात ज्यावेळी वरील सर्व अहवालांची पडताळणी होते.
o अंतिम संस्कार झाल्यानंतर ‘बाकी’ राहिलेल्या इतर प्रक्रिया व ‘मृत्यू दाखला’ लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावा.
 
अशा घटना खूप काही शिकवून जातात. आपल्या कुटुंबाबाबत आपण संवेदनशील व काळजी करणारे असाल तर अशा अनेक अडचणीवर आपण मात करू शकतो.
सौजन्यः किरीटनामा”
 
“किरीट सोमैय्या, माजी खासदार

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content