Details
धनगर आरक्षणाचा तिढा लवकर सोडवा! शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी
01-Jul-2019
”
केएचएल ब्युरो
महाराष्ट्र राज्यात सुमारे दीड कोटींची लोकसंख्या असलेला धनगर समाज गेल्या सात दशकांपासून हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच अद्याप या समाजाचा एकही खासदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘अनुसूचित जाती- जमातीं’च्या यादीत धनगर समाजाचा समावेश करून त्यांना त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या यादी’त 36 व्या क्रमांकावर ‘धनगड’ असा उल्लेख आहे. याच्या आधारे आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे, असंही शेवाळे म्हणाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.”
“केएचएल ब्युरो