HomeArchiveदुनियेतील दुमजली विमान...

दुनियेतील दुमजली विमान लवकरच इतिहासजमा!

Details
दुनियेतील दुमजली विमान लवकरच इतिहासजमा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

एअरबसचे सुपरजम्बो बंद, साडे तीन हजार बेकार

विमान क्षेत्रात आपल्या महाकाय आकाराने ख्याती मिळवणाऱ्या ए ३८० या विमानाला आता चित्रातच बघावे लागणार आहे. जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान म्हणून त्याचं नाव आहे. या युरोपिअन कंपनीने आपले शेवटचे विमान २०२१ साली तयार होऊन बाहेर पडेल, असं जाहीर केलंय. कमी विक्री नि छोट्या आकाराच्या विमानांना मागणी यामुळे हा निर्णय घेत असल्याचं कंपनीने सांगितलंय. अमेरिकन बोईंगला टक्कर देण्यासाठी, त्यासाठी असलेली वाढती मागणी पाहून या विमानाची निर्मिती झाली. ए ३८०ने २००५ साली पहिले उड्डाण केले. मोठ्या आकाराच्या बोईंगला तेव्हा प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कंपनीने विशालकाय आकाराचे ५४४ प्रवासी वाहून नेईल असं दुमजली विमान बनवले. मात्र,सुरूवातीची काही वर्षं सफलता मिळाल्यावर मागणीत घट येऊ लागली. नव्या विविध विमान कंपन्या छोट्या नि स्मार्ट विमानात रुची दाखवत आहेत.

या विमानाचा सर्वात मोठा ग्राहक एमिरात ही विमान कंपनी आहे. बोइंग ७७७ नि ए ३८० च्या जीवावर जागतिक ब्रँड उभा करणाऱ्या एमिरातच्या ताफ्यात आज या विमानाची संख्या शंभर इतकी आहे. त्यामुळे सर्वधिक दुःख कंपनीला झालं असून एमिरात्सचे अध्यक्ष शेख अहमद बिन सैद अल मुकतूम यांनी या विमानाची प्रारंभापासून भुरळ असल्याचं म्हंटल आहे. या विमानाच उत्पादन बंद करण्याने एअरबसला ४६.३ कोटी युरोचा फटका बसणार आहे. पण,युरोपिअन सरकारांनी दिलेल्या एक अरब युरो कर्जाची माफी होऊ शकते. याच कर्जाच्या मुद्द्यावरून बोईंगबरोबर वादही सुरू आहे.

एअरबसचे सीइओ टॉम एंडर्सनुसार, हा निर्णय आमच्यासाठीही दुःखद होता. आम्ही सुपर जम्बो बनविण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. मोठी गुंतवणूकही केली होती. पण आम्हाला व्यावहारिक होणे भाग आहे. कर्मचारी कपातीबाबत पुढील काळात कामगार संघटनांशी चर्चा करू. शेवटच्या विमानाची मागणी २०२१ला पूर्ण केली जाईल. एमिरत्सने ए३८० ची नोंदणी कमी केल्याने हा निर्णय घ्यावा लागला. त्याऐवजी ए ३५० नि ए ३३० निओ मॉडेलच्या ७० विमानाची मागणी एमिरात्सने दिली आहे.

चिंतेचं वातावरण

दरम्यान, या निर्णयाने विमान कंपन्यांमध्ये चिंतेचं नि घबराटीचे वातावरण तयार झालं आहे. आगामी काळात एअरबस फक्त १७ विमानाचं उत्पादन करणार आहे. त्यातील तीन जपानची ए एन एअरलाईन्स तर उर्वरित चौदा एमिरात्स खरेदी करीत आहे. या खरेदीदारांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. जोपर्यंत या कंपन्या ए ३८० चा वापर चालू ठेवतील तोपर्यंत अनुषंगिक सेवा मिळत राहतील अस कंपनीने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी दहा मार्चला केनियात एथियोपिया एअरलाईन्सचं चार महिन्यांपूर्वी घेतलेलं बोईंग ७३७-८०० विमान उड्डाणानंतर अवघ्या सहा मिनिटातच कोसळलं. त्यातील सर्व १५७ जण ठार झाले असून त्यात चार भारतीयांचा समावेश आहे. संपर्क तुटल्याने ही दुर्घटना घडली. नैरोबीला जाणारे हे विमान पडल्यानं या कंपनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण बोईंग विमानं सुरक्षित चालवणं, हाताळणे यात या कंपनीचा नावलौकिक होता. या मॉडेलच्या विमान उड्डाणाला इंग्लंड, नेदरलँड, तुर्कीसह भारतानेही बंदी घातली आहे. गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्या अपघाताने काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याने या दुर्घटना होत असल्याची शंका व्यक्त होतेय.

सदर मॅक्स प्रकारची विमानं देशात स्पाईस जेटकडे जास्त आहेत. यामागचे कारण नि त्याचे निराकरण होईपर्यंत बंदी उठवली जाणार नाही असं नागरी विमान मंत्रालयाने सांगितले. स्पाईस जेटनंही नागरिक सुरक्षेला प्राधान्य असे सांगत वापर थांबवलाय. आशियातील मलेशिया, सिंगापूर, ओमान यांनी बंदी तर इंडोनेशिया, चीनने विमानचा वापर न करण्याचा सल्ला स्थानिक कंपन्यांना दिलाय. फ्रांस, जर्मनी यांनीही उपयोग थांबवलाय. यामुळे हवाई विश्व हवा-हवाई झाल्याचं दिसून येतंय. उत्पादक देश अमेरिकेने सावध भूमिका घेत अपघाताचा तपास अद्याप प्रथमिक स्तरावर असल्याचं सांगत नेमकी कारणं पुढे आल्यावरच निर्णय घेऊ असं म्हंटलंय.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content