HomeArchiveदीर्घायुष्‍याची गुरूकिल्‍ली 'चालणे'!

दीर्घायुष्‍याची गुरूकिल्‍ली ‘चालणे’!

Details
दीर्घायुष्‍याची गुरूकिल्‍ली ‘चालणे’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
‘चालून चालून पाय दुखतात’ ही आपल्‍यातल्‍या बहुतांशी लोकांची तक्रार असते. मात्र आजकाल वाहतुकीच्‍या विविध साधनांमुळे फार वेळ व फार दूरपर्यंत पायी चालणे जवळपास दुरापास्‍तच झाले आहे. पूर्वीचे लोक साधने उपलब्‍ध नसल्‍यामुळे प्रवास व दळणवळणासाठी पायीच प्रवास करत असत. त्‍यामुळे त्‍यांचे स्‍वास्‍थ्‍य व आयुष्‍य चिरकाल टिकणारे होते. आज पायी चालणे कमी झाल्‍याने लोकांना हाडे व मणकयांचे असंख्‍य आजार जडू लागले आहेत. खरेतर पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम आहे. त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. दिवसभर काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. शिवाय हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते.

आज चालण्‍याची सवय हरवत चालल्‍यामुळे आपण थोडे जरी चाललो तरी आपल्याला अनेकदा दम लागतो. मात्र लक्षात ठेवा असे होत असल्यास हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर अजिबात सोडू नका. कारण व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम चालणे आहे. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम तंदुरूस्त राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो. रोज दहा हजार पावले चालणे ही दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. अनेकजण मोठमोठया इमारतीत राहत असले व इमारतीस लिफ्टची सुविधा असली तरी जिने पायी चढणे पसंत करतात. जिने चढल्‍याने पायी चालण्‍याचे फायदे मिळतात.

आज आपल्‍याजवळची उद्द्याने व जॉगींग ट्रॅक्‍स पाहिले तरी तेथील वाढलेली गर्दी चालण्‍याचे महत्त्व अधारेखीत करतात. साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास दोनशे कॅलरी खर्च होतात. पाठीचे दुखणे, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, श्वासाचा त्रास हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे फायदेशीर ठरते. थोड्या वेगात, लयबद्धरित्या आणि ज्यात पावलांवर कमी दाब पडतो अशी शारीरिक क्रिया म्हणजे फिटनेस वॉकिग. यातून व्यायाम केल्यानंतरचे सर्व फायदे मिळतात. फिटनेस वॉकिंग म्हणजे जोरात पळणे किंवा जॉगिंग नव्हे. फिटनेस वॉकिंगमुळे ह्रदयाची गती वाढते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. चयापचय संस्था सुधारते. त्याचप्रमाणे कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा विशेषतः सकाळी वीस ते तीस मिनिटे न थांबता चालणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

वजन जास्त आहे आणि चालण्याचा वेगही जास्त आहे, अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे जास्त कॅलरी खर्च होतात. टेकडी किंवा डोंगरवर चढउतार केल्यास कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण वाढते. पण त्याचवेळी आहारावर नियंत्रणही महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वेगाने चालण्याने पाय, पोटाच्या पेशींना ताकद मिळते. त्यामुळे चरबी कमी होते. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा खूप सोपा व्‍यायाम आहे. रोज जर तुम्ही ठराविक वेळ चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील. चालणे हा अखर्चिक, सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार आहे. कोणत्याही प्रकारच्या साधन-साहित्याशिवाय करता येणारा, शरीर तंदुरूस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार आहे. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते.

चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम आहे. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. मोतीबिंदूची शक्यता कमी होते. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते तसेच दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य तीन वर्षांनी वाढते. कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. चालण्‍याचा व्‍यायाम करायला वयाची मर्यादा नाही. मात्र झेपेल इतकेच चालणेदेखील खूप महत्‍वाचे आहे.

एकंदरीत, नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. शरीर निरोगी व सुदृढ ठेवायचे असेल तर दररोज थोडेतरी चालणे ठेवायला हवे. कमी अंतरासाठी वाहने न वापरता पायी चालण्‍याचा शिरस्‍ता पाळा. सकाळ, संध्‍याकाळ व जमेल तसे स्‍वच्‍छ हवेत चालण्‍याचा संकल्‍प प्रत्‍येकाने करावा. अत्‍यंत सोपा, विना खर्चाचा, कधीही कुठेही करता येणारा चालण्‍याचा व्‍यायामप्रकार प्रत्‍येकाने अंगीकारावा यासाठीच हे आरोग्‍यमंथन.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content