HomeArchiveदिवाळीत किरकोळ खरेदीकडे...

दिवाळीत किरकोळ खरेदीकडे ग्राहकांचा कल

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
यंदा दिवाळीत कपड्यांच्या किरकोळ खरेदीकडे ग्राहकांचा वाढलेला कल दिसून आला. त्यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायात यंदा व्यावसायिकांना उद्योग भरभराटीला चालना मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
 
 
याच पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन कंपन्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करावयास सुरूवात केली असून टाटाच्या अधिपत्याखालील ट्रेंट लिमिटेड या भारताच्या सर्वात मोठ्या व जलदगतीने विकसित होत असलेल्यात झुदियो या कपड्यांच्या किरकोळ विक्रीचे भारतातील ७५ वे दालन भिवंडी येथे सुरू झाले आहे. यापूर्वी भारतातील ७०वे दालन नालासोपारा येथे सुरू करण्यात आले होते. वस्त्रोद्योग व्यवसायाच्या या भरभराटीमुळे व्यावसायिकांना नवीन चालना मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

 
“ऑनलाईन शॉपिंग वर सरकारने विविध नियम व अटी घातल्यामुळे आता ग्राहकांचा खरेदीसाठी किरकोळ विक्री दालनांकडे कल वाढताना दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर भागातही वाढती लोकसंख्या लक्षात घेता याठिकाणी मॉलचे जाळे दिवसेंदिवस पसरत आहे. चांगले कापड घेण्याची ग्राहकांची आवड लक्षात घेता त्यादृष्टीने कापड निर्मिती कंपन्याही त्या दिशेने पाऊल टाकत आहेत. टाटा कंपनीने झुदिओ अंतर्गत आकर्षक फॅशनेबल पोशाख, पुरूषांचे पोशाख, महिलांचे पोशाख, पारंपरिक पोशाख, लहान मुलांचे पोशाख, फूटवेअर व अॅक्से,सरीजचे फॅशन कलेक्श,न्सा याठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ग्राहकांचाही किरकोळ खरेदीकडे कल वाढत असल्याचे यंदा दिवाळीत दिसून आले.”

 

 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content