HomeArchiveदानातून कृतज्ञतेकडे जाण्याचा...

दानातून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग – अवयवदान!

Details
दानातून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग – अवयवदान!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात परोपकाराची भावना लोकांच्या मनात तग धरून आहे ही बाब नाकारून चालणार नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरूषाचे अकाली कोमात जाणे कुटुंबातील सर्वांसाठीच दुःखप्रद असते. मात्र अशा अवघडप्रसंगी घरातील कुटुंबियांनी मन घट्ट करीत त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना भिवंडीत मागील आठवड्यात घडली. भिवंडी शहरातील कासार आळी येथील इमारतीत राहणारे स्वतःचा व्यवसाय करणारे कमलेश हस्तीमल जैन हे ४६ वर्षीय गृहस्थ ५ मे रोजी मीरा-भाईंदर येथे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. रात्री अकरा वाजता माघारी घरी परतत असताना त्यांचा अपघात होऊन दुचाकी वरून पडल्याने ते जखमी होऊन कोमात गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भिवंडीतील ऑर्बिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ब्रेन डेड झाल्याचे जाहीर केले.

या घटनेनंतर दुःखाचा डोंगर कुटुंबियांवर कोसळला असताना कमलेश जैन यांचे वडील हस्तीमल जैन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयास पत्नी आणि मुले यांनीसुध्दा साथ दिली. परंतु भिवंडी शहरात अवयवदान करण्याबाबत मान्यताप्राप्त रूग्णालय नसल्याने ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात संपर्क साधण्यात आला. तेथील वैद्यकीय पथक भिवंडीच्या रूग्णालयात दाखल झाले. कमलेश जैन यांना ९ मे रोजी ज्युपिटर रूग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी विविध वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीरातील किडनी, लिव्हर, स्वादूपिंड, त्वचा आणि डोळे हे अवयव दान करण्यात आले असून गरजवंत रूग्णांना त्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. कमलेश जैन यांच्या अवयवदानाने किमान तीन जणांचे प्राण वाचू शकणार असून त्यांच्या डोळ्याने एक दृष्टिहीन जग पाहू शकणार आहे. त्यामुळे कमलेशच्या स्मृती चिरंतर राहणार आहेत.

अशीच एक घटना मार्च महिन्यात वाशी येथे घडली. ५९ वर्षांच्या एका महिलेला नवी मुंबईच्या वाशीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तपासणीत त्यांचं ब्रेन हॅमरेज झाल्याचं निदान झालं. अखेर डॉक्टरांनी त्या महिलेला ब्रेनडेड घोषित केलं. या महिलेच्या कुटुंबियांनी तत्काळ रूग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि कुटुंबाच्या परवानगीनुसार या महिलेचं यकृत, किडनी, तसंच डोळे आणि हाडं दान करण्यात आली. यकृत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. एक किडनी अपोलो हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी ज्युपिटर हॉस्पिटलमधील रूग्णाला देण्यात आली. डोळे लक्ष्मी आय बँकेत आणि हाडं टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आले.

अशीच एक अवयवदानाची घटना मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यातच घडली. एका ४६ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रूग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. कुटुंबाचं अवयवदानासंदर्भात समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. या अवयवदानामुळे इतरांना जीवनदान मिळाले आहे. त्याचप्रमाणे बीडमधील एका १७ वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता. नवी मुंबई, वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी अवयवदानाला परवानगी दिली. मुलाच्या कुटुंबाच्या परवानगीनुसार मुलाचे यकृत, दोन्ही किडनी, फुफ्फुस हे अवयव तसेच त्वचा आणि दोन्ही डोळेही दान करण्यात आले. त्या मुलाच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवनदान मिळाले आहे. एक किडनी हिरानंदानी हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेला देण्यात आली, तर इतर अवयवही गरजूंवर प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.

विविध कारणांनी अवयव निकामी झाल्याने एकेका अवयवासाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे जी वस्तुस्थिती आहे. खरेतर मरणोत्तर अवयवदानाबद्दल बऱ्याच रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे याबाबतची जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. अवयवदानासारखे दान जगात दुसरे कुठले नसून एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याने दान केलेल्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवता येतात. कुणी जन्मताच अवयवरहित असतो, कुणाच्या अपघातात अवयव निकामी होतात, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य संपते. आयुष्याच्या प्रवासातील त्यांचे जगणे थांबून जाते. अशावेळी ह्या अवयवांचे महत्त्व खूप वाढते. त्यांना एखाद्या अवयवदात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते. त्याचा जीवनप्रवास पुन्हा त्याच आनंदाने सुरू होतो. अवयव दात्यालादेखील त्याच्या अवयवांच्या दानातून दुसऱ्या माणसाच्या शरीराच्या माध्यमातून जिवंत राहता येते.

अवयवदानासारखे सुख इतर कशात नाही. मात्र आपल्या देशात अवयवदानाबाबत फारशी जागृती नाही. इतर देशांत म्हणजेच ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व पूर्वीच ओळखले. यासाठी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज परदेशात अवयवदानातून हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात अवयवदानाचा टक्का मात्र प्रति १० लाख लोकांमागे केवळ ३४ आहे. अलीकडच्या काळात हा टक्का थोडाफार वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याची टक्केवारी अधिक नाही हेदेखील तितकेच खरे आहे. माणूस आपले अवयव निर्माण करू शकत नाही. मात्र हेच अवयव तो दान करू शकतो. मृत्यू ला रोखण्या ची ताकद या अवयवदानात आहे. कायदयानुसार मानवी अवयवांची विक्री करता येत नाही. मात्र त्यांयचे दान करता येते.

अवयवदानानंतर मिळालेल्यार अवयवाचे व्यरवस्थिात प्रत्याहरोपण व्हा्वे व त्या्दरम्या न कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हाणून शासनाने त्याासाठी अवयव प्रत्याहरोपण कायदा अंमलात आणला आहे. सन १९९४ साली ‘मानवी अवयव प्रत्याठरोपण कायदा’ आपल्यां देशात अस्तित्वा‍्यत आला व अवयव प्रत्यानरोपणास कायदेशीर मान्यवता मिळाली. अवयवदान जिवंतपणी आणि मृत्यू नंतरदेखील करता येते. जिवंत असताना एक मूत्रपिंड (किडणी), यकृताचा (लिव्ह्रचा), आतडयाचा, स्वाकदूपिंड व फुफ्फुसाचा काही भाग आपल्याड रक्ता च्याा नातेवाईकांना सरकारची परवानगी काढून कायदयाने दान देता येतो. रक्ता्च्या नातेवाईंकांत सुधारीत कायदयानुसार आई-वडील, भाऊ–बहिण, मुलगा-मुलगी, पती-पत्नीा, आजी-आजोबा, नातवंडे यांचा समावेश होतो.

माणसाच्याा मृत्यूननंतर ह्रदयक्रिया बंद पडते व त्या नंतर सर्व अवयव दान करण्यानसाठी निकामी होतात. केवळ नेत्र, त्वबचा, अस्थी् (हाडे) इत्यातदी मरणानंतर ४ ते ५ तासांच्यात कालावधीत दान करता येऊ शकतात. गंभीर जळलेल्याा व्यनक्तीवचे प्राण त्वसचेच्याय दानाने वाचवता येतात तर नेत्रदानाने अंध व्यंक्ती स दृष्टी प्रदान करता येते. त्यामुळे अवयवदानातून वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती शक्य आहे ज्यायोगे अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. या दानातून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अवयवदान. अलिकडल्या काही उदाहरणांवरून मरणोत्तर अवयवदानाबद्दल लोकांच्या मनात काही प्रमाणात जागृती होताना दिसत असून त्यामुळे समाजात संवेदनशीलता वाढत असल्याची बाब नक्कीच समाधानकारक आहे.
अवयवदान श्रेष्ठ दान!”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content