HomeArchiveदादर- माहीम चौपाटीला...

दादर- माहीम चौपाटीला मिळणार नवा लूक!

Details
दादर- माहीम चौपाटीला मिळणार नवा लूक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

खासदार राहुल शेवाळेंच्या संकल्पेनेतील प्रकल्पाचे भूमिपूजन

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]

खासदार राहुल शेवाळे यांच्या संकलपनेतून साकारल्या जाणाऱ्या दादर-माहीम चौपाटीच्या सौन्दर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा साजरा झाला. यावेळी आमदार सदा सरावणकर, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, मिलिंद वैद्य, प्रीती पाटणकर, शीतल गंभीर, नगरसेवक मिलिंद वैद्य, भाजपा माहीम विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर, वास्तुरचनाकार शशांक मेहंदळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वरळी ते माहीम चौपाटी या सुमारे 5 किमीच्या समुद्रकिनाऱ्याला ‘नवा लूक’ देणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा, ज्ञानेश्वर उद्यान ते पांडुरंग नाईक मार्ग हा सुमारे 475 मीटरचा आहे. सुमारे 4.72 कोटी रुपये खर्च करून या पहिल्या टप्प्यात सौन्दर्यीकरण केले जाणार आहे. यामध्ये 20 फूट लांबीचा पदपथ, सोलार पॅनल बसविलेल्या शेड्स, दादर चौपाटीचा इतिहास सांगणारी भित्तीचित्रे, लँडस्केप गार्डन्स, व्हियुईंग गॅलरी अशा अनेक सोयीचा अंतर्भाव असणार आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील टप्प्यांत संपूर्ण 5 किमीच्या समुद्रकिनाऱ्याचे सौन्दर्यीकरण केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असल्यापासून दादर चौपाटीचा कायापालट करणं, हे माझं स्वप्न होतं. त्यासाठी प्रयत्नही करत होतो. मात्र, काही वर्षांपूर्वी काही मंडळींनी केवळ राजकीय स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने चौपाटीवर टेट्रापॉड टाकले आणि पदपथ बनविला. मात्र, आता शास्त्रीय पद्धतीने या सौदर्यीकरणाला सुरूवात होतेय, याचा मला आनंद आहे, असे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

अर्धवटरावांच्या उलट्या बोंबा

चुकीच्या पद्धतीने दादर चौपाटीचे अशास्त्रीय सुशोभीकरण करणाऱ्या मनसेने आजच्या भूमिपूजन सोहळ्यापूर्वी काही प्रसारमाध्यमांकडे उलट्या बोंबा मारल्या. मात्र, खासदार शेवाळे यांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तराने ही कुल्हेकुई थंडावली.

दादर चौपाटी होणार आंतरराष्ट्रीय लँडमार्क

दादर चौपाटीला होणाऱ्या नव्या व्हियुईंग गॅलरीमधून समोर सी लिंक दिसतो. या सी लिंकवर दरवर्षी 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आतषबाजी आणि लेझर शो करण्यात येईल. ही आतषबाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवं लँडमार्क म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा या कार्यक्रमात खासदार शेवाळे यांनी केली.”
 
“खासदार राहुल शेवाळेंच्या संकल्पेनेतील प्रकल्पाचे भूमिपूजन

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content