Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राकडून पं. संजीव अभ्यंकर यांना पुरस्कार प्रदान
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गानसरस्वती पुरस्कार ख्यातनाम गायक कलाकार पं. संजीव अभ्यंकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, मानपत्र असे त्याचे स्वरूप असून किशोरी आमोणकर यांचे शिष्य डॉ. अरूण द्रविड यांच्या निधीतून तो दिला गेला.
यावेळी पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाचाही शानदार कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. प्रथम ते मारवा राग गायले. पिया नही आवे.. या एकतालातील बडा ख्यालची संथ आलापीने सुरूवात करून ताना बोलताना व सरगम हे तिन्ही लीलया मांडून मारव्याची खासियत अत्यंत प्रभावीपणे मांडली. द्रूत ख्याल होता, देख देख बाट तोरी, द्रूत ताना आणि सरगम यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
सहसा न गायला जाणारा राग भिन्न षड्ज अतिशय सुंदररित्या मांडला. बंदिश होती रूपक तालातील किन बिरामये आणि याच रागात उत्कृष्ट तराणा सादर केला. त्यानंतर सोहनी रागातील द्रूत चीज काहे अब तुम गाऊन कार्यक्रमाची सांगता भैरवी रागातील पं. जसराज यांनी प्रथम गायलेली चीज निरंजनी नारायणी याने केली. तबल्यावर त्यांना यति भागवत यांनी व संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी यांनी यथायोग्य साथ दिली.”
“केएचएल न्यूज ब्युरो