Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा विशेष कार्यक्रम
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने संगीताच्या विद्यार्थ्यांना प्रख्यात गुरूजनांकडून प्रगत शिक्षण देण्याच्या हेतूने दोन वर्षांच्या अवधींसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीधारकांचा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 4 मे आणि रविवार दिनांक 5 मे 2019 या दिवशी सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून तरूण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व कंसात त्यांच्या गुरूंची नावे अशीः
4 मे – नेहा पुरोहित (पं. अरूण कशाळकर), सायली आचार्य (मंजिरी आलेगावकर), चैतन्य देशपांडे (पं. सुरेश बापट), आदिती गुरव (डॉ. ज्योती काळे), गहिनीनाथ गुरव (पं. सदानंद नायमपल्ली).
5 मे – जयश्री पाटील (अपूर्वा गोखले), साहिल भोगले (निषाद बाक्रे), सुनीता भट (गौरी पाठारे), प्रियांका भिसे (अपूर्वा गोखले), सुस्मिरता डवाळकर (देवकी पंडित).”
“केएचएल न्यूज ब्युरो