Details
दादरमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अंतर्गत वाद मिटवून पुन्हा ‘शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती’ लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा दादर पूर्वेच्या कोहिनूर हॉलमध्ये पार पडला. यावेळी तीनही पक्षांच्या नेत्यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला.
या मेळाव्याला शिवसेना खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक, आमदार प्रकाश फातर्फेकर, तुकाराम काते, मनीषा कायंदे, विभागप्रमुख मंगेश सातमकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, उपमहापौर हेमांगी वरळीकर, भाजपचे आमदार प्रसाद लाड, सुनील राणे, जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही काळात शिवसेना आणि भाजपमध्ये आलेली कटुता महायुतीच्या घोषणेनंतर संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागून महायुतीचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांना विजयी करण्याचा निर्धार करावा, असं आवाहन सर्वच वक्त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.”
“केएचएल न्यूज ब्युरो