HomeArchiveतडाखा आणि भीती..

तडाखा आणि भीती..

Details
तडाखा आणि भीती..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
मुंबईतील पाऊस थोडा उणावल्यामुळे शहरातील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण ठाणे व पालघर जिल्ह्यात अद्यापी मोठ्या पावसाची भीती आहे. हवामान खात्याचा तसा इशाराच आहे. सहाजिकच लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. पालघरमध्ये अनेक विभाग आजही पाण्याखाली आहेत. उल्हास, बारवी नद्यांचे पाणी थोडे उणावलेले असले तरी धरणे पूर्ण भरल्यामुळे वाढणारा पाऊस अधिक पूर घेऊन येणार आहे. कोकणातील स्थितीही निराळी नाही. महाड असेल, खेड असेल, राजापूर असेल.. सर्वत्र गावांतून, पेठांतून पुराचे पाणी शिरले. गेल्या कित्येक वर्षांत इतके पाऊसबळी गेले नव्हते. यंदा पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 138 व्यक्तींचा मृत्यू ओढवला. चिपळूणमध्ये पाणी ओसरते आहे. पण, रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पुराचे स्वरूप लक्षात घेता, सावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) सज्ज ठेवण्यात आली आहेत. गेले सुमारे दोन आठवडे कोकणातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरे, दुकाने, गोठे आणि सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही विलंबाने धावत आहेत. एकूणच कोकणातील जनजीवनावर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पावसाचा फटका राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या तालुक्यांना सर्वाधिक बसला आहे. बदलापूर, कल्याण परिसरात तसेच रायगडमधील उरणमध्ये पुराचे पाणी ओसरल्यानंतर आणखी संकटांची मालिका भेडसावत आहे. कित्येक खेड्यापाड्यांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. वीज यंत्रणा कोलमडलेली असल्यामुळे जनता आणखी अडचणीत सापडत आहे. राज्य सरकारने पुरानंतरच्या स्थितीत आरोग्य सेवा पुरवण्याकडे लक्ष दिले हे योग्यच आहे. राज्य सरकराने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याची यंत्रणा सज्ज केली आहे. वैद्यकीय मदतीसाठी 160 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये महापुराचा हाःहाकार उडाला होता.

या दोन्ही शहरांतून अनुक्रमे ३२ हजार आणि १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुणे आणि साताऱ्यात आणखी पन्नास हजारांना पुराच्या पाण्यापासून वाचवावे लागले आहे.
कोल्हापूर व सांगली शहरांमध्ये मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासोबतच नौदलालाही पाचारण करण्यात आले आहे. गेल्या नऊ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागांतील सर्व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने सांगलीला पुराचा वेढा पडला. पूरस्थिती अधिकच गंभीर झाली तेव्हा शहरातील विख्यात गणेश मंदिर परिसरातील बाजारपेठेतही पाणी पोहोचले. टिळक चौक, हरभट रोड, मारूती रोड या मुख्य बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची स्थिती तिसऱ्या दिवशीही आणखी गंभीर बनली होती. काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केल्याने स्थिती अधिक गंभीर बनली. पंचगंगा नदी बुधवारी धोका पातळीपेक्षा १३ फूट अधिक उंचावरून वाहत होती तर अन्य नद्यांनीही महापुराचे नवे विक्रम नोंदवले आहेत.

एनडीआरएफ, नौदल, लष्कराच्या जोडीने स्थानिक तरूणांनी या भागात मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातून तब्बल ५५ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अधिकचे पाणी पुढे सोडणे गरजेचे असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संवाद साधून विसर्ग वाढविण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची पातळी खाली येईल, अशी अपेक्षा असली तरी तसे अद्यापी झालेले नाही. पंचगंगेची पातळी फुटांमध्ये वाढली होती ती आता इंचांमध्ये खाली उतरते आहे. यातील अलमट्टी धरण हा एक कळीचा मुद्दा आहे. 2005 हे धरण पूर्ण झाल्यापासून दक्षिण महाराष्ट्र दरवर्षीच पुराच्या छायेत येतो. विशेषतः उत्तम पाऊस झाला की जुलैमध्ये या भागात पूर येतोच येतो. सांगली कोल्हापुराला पुराचा जो दणका बसला त्यात पावसापेक्षा कन्नडी आगाऊपणाचा वाटा अधिक होता. सांगलीपासून आग्नेय दिशेने साधारण 240 कि. मी. खाली गेल्यास कर्नाटकातील अलमट्टी धरण लागते. बागलकोटजवळ कृष्णा नदीवरचे त्या भागातील सर्वात मोठे असे हे धरण आहे. त्यात 200 टीएमसी इतके पाणी साठू शकते.

आपल्या कोयना धरणाची क्षमता आहे 72 टीएमसी. म्हणजे कोयनेच्या तिप्पट मोठे असे हे धरण तब्बल 524 मीटर उंचीचे बांधले गेले आहे. आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्रात कृष्णेच्या पाणी वाटपाचे वाद आहेतच. पण अलमट्टीमुळे पावसाळ्यात कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका वाढतो हे सिद्ध झालेले आहे. तरीही कर्नाटक ते पूर्ण भरण्याचा आग्रह धरत असते. यंदाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी कर्नाटकातील नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडेना विनंतीवजा मागणी केली की अलमट्टीचे पाणी अधिक वेगाने पुढे सोडा. कर्नाटकातील नवे सरकार सत्तारूढ होण्यासाठी जनता दल व काँग्रेसचे फुटीर आमदार मुंबईत ठेवून घेण्याची मोठी कामगिरी फडणवीसांनी पार पाडलेली आहे हे खरे, पण तरीही येडियुरप्पा फडणवीसांची विनंती मान्य करतीलच असे नाही. सर्वोच्च न्यायालयाने अलमट्टीमधील पाणी पातळी 519 मीटर ठेवण्याची अनुमती दिलेली आहे. त्यामुळे तर कर्नाटकाचे फावलेलेच आहे. तरीही महाराष्ट्राच्या विनंतीला मान देऊन अलमट्टीमध्ये पाणीसाठा 518 मीटर ठेवावा असे आदेश कर्नाटक सरकारने दिल्याच्या बातम्या आहेत.

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. या विसर्गामुळेच कराडमध्ये पूर आला आहे. कोयना, पंचगंगा यांचे सारे अधिकचे पाणी शेवटी कृष्णेत येत असल्यामुळे सांगलीलाही पुराचा वेढा पडला. राज्यात सर्वत्र पावसाचा तडाखा बसत असतानाच नागरिकांमध्ये भीतीदायक अफवा पसरवण्याचा उद्योग काही अतिउत्साही मंडळी करत आहेत. रस्ता खचला, पूल वाहून गेला, धरण फुटले अशा अफवांना आवर घातला पाहिजे. कोणतीही शहानिशा न करता समाजमाध्यमातील संदेश जशाच्या तसा उचलून पुढे ढकलण्याचे आपण बंदच केले पाहिजे. शहरातील एखादा पूल कोसळला आहे, पुलावरून पाणी वाहत आहे, रस्ता खचला आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. काही जुन्या ध्वनि-चित्रफिती पुण्यातील वा कोल्हापुरातील असल्याचे भासवून त्या पुढे ढकलण्यात आल्यामुळे अधिक गोंधळ होऊ शकतो. नागरिकांनी एखादा संदेश आल्यानंतर त्याची खातरजमा करावी. अशा प्रकारचा संदेश दुसऱ्याला पाठविण्याची घाई करू नये. एखाद्या घटनेबाबत काही माहिती हवी असल्यास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क केला पाहिजे. आपण जबाबदारीने वागलो नाही तर संकट अधिक गहिरेच होणार आहे याचे भान ठेवावे लागेल.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content