Details
डॉ. शंकर किंजवडेकर यांना कनक समाजरत्न!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कनक प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच डी.एस. हायस्कूल, सायन, मुंबई येथे पार पडला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. शंकर किंजवडेकर यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री पूजा रायबागी यांना कलारत्न, मीनल बांदेकर यांना डॉ. नितू मांडके स्मृती वैद्यकीय, नारायण गीते यांना गुरूवर्य गोडबोले आदर्श शिक्षक व सखाराम पुंडे यांना डॉ. राधाकृष्णन आदर्श शिक्षक या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कनक गुणवंत, कनक सन्मान, कनक शिष्यवृत्ती, एनटीएस व एनएमएमएस सराव परीक्षेतील स्कॉलर विद्यार्थी पुरस्कार अशा एकूण २५० विद्यार्थ्यांना मानपत्र व पदक देऊन सन्मानित केले गेले.
या प्रसंगी शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, अध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष सुभाष जगताप, कार्यवाह मनोज दातखिळे, विश्वस्त एम. आर. नारखेडे, दिलीप बारस्कर, कैलास चव्हाण, सुनंदा नारखेडे अदि पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो