Details
‘डेमोक्रॅसी अँड मी’ स्पर्धेच्या विजेत्यांचा दिल्लीत सत्कार!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या युवकांनी अनुभवली राजपथावरची परेड
मुंबईच्या विविध महाविद्यालयातील युवकांसाठी यंदाचा प्रजासत्ताकदिन विशेष ठरला. दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या अनोख्या स्पर्धेतील एकूण 26 विजेत्यांना दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाची परेड पाहण्याची संधी मिळाली. चार दिवसीय दिल्ली दौऱ्यात, राष्ट्रपती भवन, संसद भवनासह राजधानीतील इतर महत्त्वाच्या स्थळांची विजेत्यांनी सफर केली.
लोकशाहीबाबत सध्याच्या तरुणांची नेमकी काय मते आहेत, हे जाणून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी दक्षिण-मध्य मुंबईतील 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. 10 जानेवारी आणि 13 जानेवारी अशा दोन टप्प्यात पार पडलेल्या या स्पर्धेला तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिला. अडीच हजारांहून अधिक स्पर्धकांमधून एकूण 26 विजेत्यांची निवड करण्यात आली. या विजेत्यांना चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर नेण्यात आले. या दौऱ्यात राष्ट्रपती भवन, संसद भवन यांसह राजधानीतील महत्त्वाच्या वास्तूंना, विजेत्यांनी सदिच्छा भेट दिली. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असणाऱ्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या परेडला उपस्थित राहण्याची संधीही या विजेत्यांना मिळाली. एका छोटेखानी समारंभात, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन या 26 विजेत्यांना दिल्लीत सन्मानित करण्यात आले. तरूण मतदारांनी लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घ्यावा, या हेतूने सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करण्याचा संकल्प खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी सोडला.
तरूण वर्गाने लोकशाहीबाबत आपली मते ठामपणे मांडावीत आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवावा, या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धेला तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला. हे विजेते लोकशाहीचे दूत बनून आपल्या सकारात्मक विचारांनी देशाचे भविष्य उज्वल करतील, अशी मी आशा बाळगतो, असे खासदार राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.
‘डेमोक्रॅसी अँड मी’ या स्पर्धेमुळे आम्ही लोकशाहीबाबत आमची मते मांडू शकलो. ही स्पर्धा जिंकून केलेला दिल्ली दौरा, हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय काळ म्हणावा लागेल, असे या स्पर्धेतली विजेती प्राची परब म्हणाली.”
“केएचएल न्यूज ब्युरो