HomeArchiveजोगेश्‍वरीत आजपासून मिसळ...

जोगेश्‍वरीत आजपासून मिसळ महोत्सव!

Details
जोगेश्‍वरीत आजपासून मिसळ महोत्सव!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

कोल्हापुर, पुणे, नाशिकची मिसळ असेल खवैय्यांसाठी..
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मालवणी मिसळ, माठातली मिसळ, अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या मिसळची चव जिभेवर ठेवणारा मिसळ महोत्सव आज म्हणजेच शनिवारपासून मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात सुरू होत आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द करण्यात आलेला हा महोत्सव १६ व १७ फेबु्वारीला होणार होता. याच ‘मिसळ महोत्सवास’ शनिवारी (२३ फेबु्वारी) सकाळी ११ वाजता सुरूवात होत आहे. स्थानिक आमदार व राज्याचे गृहनिर्माण तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते शामनगर तलाव, इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे या मिसळ महोत्सवाचे उद्घाटन होईल. दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवात विविध जिल्ह्यातील चटकादार मिसळींचा आनंद खवैय्यांना घेता येणार आहे.

‘मिसळ’ हा बहुतांशी जनतेच्या आवडीचा पदार्थ. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळीची चवही वेगवेळी असते. परंतु नोकरी धंद्यात व्यस्त असणार्‍या मुंबईकरांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबासह विविध जिल्ह्यांमध्ये मिळणाऱ्या मिसळींच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी जाता येत नाही. अशा या मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मागील वर्षी ‘मिसळ महोत्सवा’चे आयोजन केले होते. याला खवैय्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसर, शामनगर तलाव, जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबईकरांना कोल्हापूर, पुणेबरोबरच महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील मिसळच्या चवीचा मनमुराद आस्वाद एकाच छताखाली घेता येणार आहे. यंदाच्या महोत्सवात खवैय्यांना स्वादची माठातील मिसळ, नादखुळाची बंबातील, तांबडी व हिरवी मिसळ, आचरेकर यांची मालवण मिसळ (यात पावाऐवजी वडे देण्यात येणार आहे), पुण्याच्या मिसळ महोत्सवात प्रथम क्रमांक पटकविणारे कोल्हापुरातील अमित मठपती यांची मिसळ, नाशिकची माऊली मिसळ आदिंच्या मिसळींचे सुमारे १० ते १५ स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. रविवारी २४ फेबु्वारी रोजी रात्री ९ वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

महिलांसाठी पाककला तसेच मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा

यानिमित्ताने येथे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी २३ फेबु्वारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांना पराठा व भाजी किंवा पुलाव व कोशिंबीर या दोन्हीपैकी कुठलातरी एक पदार्थ घरी बनवून आणावा लागणार आहे. २४ फेबु्वारीला विधानसभा क्षेत्रातील ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ५ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येणार आहे.”
 
“कोल्हापुर, पुणे, नाशिकची मिसळ असेल खवैय्यांसाठी..

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content