Details
जीव संरक्षक उपचार पद्धती जिवलगांसाठी!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या आरोग्याविषयी सर्वत्र जागृती होताना दिसत असली तरी योग्य उपचार पद्धतीच्या अभावाने रूग्ण बरे होताना दिसत नाहीत, आजार चालूच राहतो. अनेकदा रूग्णही मनमानी करतो. यासाठी ‘डॉक्टर आपला सांगाती’ यात पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने व्याख्यान आयोजित केलंय.
येत्या रविवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मुंबईतील प्रख्यात नानावटी इस्पितळाचे डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. विषय आहे ‘जीव संरक्षक तत्काळ उपचार पद्धती’. हृदयाघात, लकवा, बेशुद्धी, पक्षाघात, आदी कठीण प्रसंगात आपल्या जवळच्यांची काळजी कशी घ्यावी यावर व्याख्यान, स्लाईड शो, प्रात्यक्षिके, शिक्षण व मार्गदर्शन होणार आहे. न्यूरॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रद्युम्न ओक, अपघात व तत्काळ चिकित्सा प्रमुख डॉ. अक्षय देवधर लोकांशी संवाद साधतील.
संघाच्या शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा आयोजित पु. ल. देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून तो सर्वाना विनामूल्य खुला आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. संजीवनी राजवाडे, सुधा आठवले, मानसी आपटे, संघ कार्यवाह मनोज निरगुडकर, यशवंत जोशी यांनी केलंय.”
“केएचएल न्यूज ब्युरो