Details
“जिन्ना हाऊस पुन: गजबजणार! पण, आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी!!”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
एकेकाळी ज्या वास्तूत भारताच्या फाळणीचे कट रचले गेले ते मुंबईतले जिन्ना हाऊस आता पुन्हा गजबजणार आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे मुंबईतले घर म्हणजेच जिन्ना हाऊस, आता आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळांसोबतच्या बैठकांसाठी उपयोगी पडणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना पाठवलेल्या पत्रामधून दिली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाद्वारे यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाला निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार लोढा यासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रयत्नशील होते. विधानसभेमध्येही त्यांनी ही मागणी केली होती. परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी लोढा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये उपलब्ध सुविधांच्या धर्तीवर जिन्ना हाऊसला विकसित करून त्याला नवीन स्वरूप देण्याचे व त्याची पुनर्रचना करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाद्वारे (पीएमओ) त्यांना मिळाले आहेत. जिन्ना हाऊसचे हस्तांतरण परराष्ट्र मंत्रालयाकडे करण्यास मान्यतासुद्धा पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
ज्या जिन्ना हाऊसमध्ये भारताच्या फाळणीचे षडयंत्र रचले गेले ते अनेक वर्षांपासून ओस पडले आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाद्वारे जिन्ना हाऊसचे स्वामित्व अधिकार प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसचा वापर भारत सरकार विदेशी गणमान्य व्यक्तींच्या दौऱ्याच्या विशिष्ट बैठकांसाठी व त्यांच्यासह भोजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी करते. स्वातंत्र्यानंतर 1982 पर्यंत ब्रिटिश उच्चायोग जिन्ना हाऊसचा वापर करत होते. त्यानंतर जिन्ना हाउस केंद्रीय सार्वजनिक कार्य विभाग (सीपीडब्ल्युडी) च्या अंतर्गत आले. तत्कालीन पंतप्रधानांच्या मान्यतेनंतर सन 1988 मध्ये शहरविकास मंत्रालयाने सीपीडब्ल्युडीला आदेश दिला व जिन्ना हाऊस इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आईसीसीआर) ला सुपूर्द केले गेले. सन 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी जिन्ना हाऊसमध्ये सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याप्रकारे, 4 फेब्रुवारी 1997 ला जिन्ना हाऊस आईसीसीआरकडे हस्तांतरित केले गेले व जिन्ना हाऊसला सार्कचे उप प्रादेशिक केन्द्र म्हणून परिवर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी सन 1936 मध्ये मुंबईचा पॉश परिसर म्हणून ओळख असलेल्या मलबार हिलमध्ये आपल्या निवासासाठी ही इमारत बनवली होती. आधी तिचे नाव साउथ कोर्ट होते आणि त्याच्या बांधकामासाठी त्यावेळी सुमारे दोन लाख रूपयांचा खर्च आला होता. ब्रिटिशकालीन इंडो गोथिएक वास्तू प्रणालीने बनलेले जिन्ना हाऊस एकूण अडीच एकरमध्ये पसरलेले आहे. जिन्ना ह्यांनी आपल्या शौकापायी ही इमारत अतिशय भव्य बनवली होती व त्यासाठी त्यात अक्रोडचे लाकूड आणि इटालियन मार्बलचा वापर केला होता.”
“केएचएल न्यूज ब्युरो