HomeArchiveचोर आणि शिरजोर!

चोर आणि शिरजोर!

Details
चोर आणि शिरजोर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
चौकीदार चोर है.. ही राहुल गांधी यांची युद्धघोषणा जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत उच्चारली तेव्हा सर्वांनाच वाटले की संपला आता युतीचा कारभार! आता काही सेना–भाजपाची युती होणार नाही. ठाकरेंच्या त्या गर्जनेनंतर लगेचच काही दिवसात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनीही स्वबळाचा नारा दिला आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी तर शिवसेनेला पटक देंगे अशी गर्जना करून टाकली. पण हे जाहीर बोलणे सुरू असतानाच दोन्ही पक्षांचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीचे शिलेदार मात्र एकमेकांशी कानगोष्टी करतच होते. राजकारणात असे नेहमीच करावे लागते. जायचे असते चीनला, पण जपानला चाललो असे दाखवायचे असते.. शिवाजी महाराजांनीच शत्रूला गाफील ठेवण्याचा, “कात्रजचा मार्ग” दाखवून ठेवला होता! त्यामुळे शिवछत्रपतींचा आशिर्वाद सांगणाऱ्या भाजपाने आणि महाराजांचेच सैनिक असल्याच्या आवेशात लढणाऱ्या शिवसेनेने तोच आदर्श समोर ठेवला असल्यास नवल नाही.

तशाही स्वबळाचा निर्धार, ‘पटक देंगे’चा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना, असे इशारे आणि घोषणा गेल्या चार वर्षे महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहूनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. पक्षाच्या मुखपत्रातून, सामनातून, शिवसेनेने भाजपावर वेळोवेळी सातत्याने प्रहार केले. भाजपानेही तितकेच पलटवारही केले. पण आता युतीवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार अशी शक्यता आता मावळलेली आहे. दोन्ही बाजूंनी थोड्याफार तडजोडी करण्याची भूमिका तशी मानसिकता ठेवली म्हणूनच दोन्ही पक्षांची पत्रकार परिषद साकारू शकली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपाला २५ तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या, म्हणजे सुमारे १३५ ते १४० प्रत्येकी जागांचे सम-समान वाटप सेना-भाजपाने केले आहे. युतीसाठी भाजपाने एक पाऊल मागे घेतले असले तरी शिवसेनेला मोठ्या भावाचा मान मात्र दिलेला नाही. विधानसभेसाठीचे मतदारसंघ अद्यापी सांगण्यात आलेले नाहीत. पण लोकसभेसाठी शिवसेनेला पालघर मतदारसंघ दिला जाणार आहे. युतीविषयी भाष्य करताना अमित शाह व फडणवीस दोघांनीही उद्धव ठाकरेंना मोठेपणा दिला. ठाकरे हे सरकारचे मार्गदर्शक राहिले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले तर उद्धवजींनी मन मोठे केल्याने आता कटुता संपली असे शाहांनी जाहीर केले. आता दोघेही मिळून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ खासदारकीच्या जागा जिंकू असाही दावा भाजपा अध्यक्षांनी केला आहे. तर, युती करत असलो तरी भाजपा नेतृत्त्वाकडून पुन्हा कटू अनुभव येता कामा नये, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हिंदुत्व, राम मंदिर आणि काँग्रेसप्रणित अविचारी लोकांच्या आघाडीला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याची गरज ही कारणे देत युती झाली आहे. गेल्या वेळेपेक्षा शिवसेनेला एक जागा जास्त मिळाली आहे. २०१४ मध्ये भाजपाने २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. आता भाजपा २५ जागांवरच लढणार आहे. राज्यातील सत्तापदांमध्येही समानतेचा निकष लावण्यात येईल, या सूत्रावर युती झाली आहे. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव जानेवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्यानंतर वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे सातत्याने भाजपावर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सातत्याने आणि प्रसंगी शेलक्या भाषेतही टीका करत होते. त्यासह मोठ्या भावाच्या भूमिकेचाही आग्रह सेनेला सोडून द्यावा लागलेला आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा होता. पण याबाबत काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. फक्त सत्तेत पदे आणि जबाबदारीचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सेनेमधील काही नेत्यांना भाजपाचा तिटकारा वाटत जरी असला तरीही शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा युतीसाठी दबाव होता. त्यांच्या मताची दखल घेत १५ वर्षांनंतर मिळालेली सत्ता राग-लोभातून घालवण्याऐवजी उद्धव यांनी व्यावहारिक शहाणपण दाखवत युती केलेली आहे. कोकणातील नाणार जाणार हा दावा मात्र सेनेने यातून खरा करून दाखवला आहे. याचा फायदा शिवसेनेला कोकणात नक्कीच होणार आहे.

भाजपा-शिवसेना युती घडविण्यात सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंसह सुभाष देसाई, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे याचे योगदान लक्षणीय म्हणावे लागेल. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार याचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. सर्वात मोठे श्रेय अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. “आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय” असे ते जाहीरपणे बोलत होते खरे, पण पडद्याआडून त्यांचे युतीचे प्रयत्न सततच चालू होते. प्रकाश जावडेकर आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात दिल्लीत गेल्या महिन्यात दोनदा चर्चा झाली तर राज्य पातळीवर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील सेना नेत्यांच्या संपर्कात होते. अखेरचा तडजोडीचा तोडगा याच चार नेत्यांनी काढला असे दिसते. शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना युतीसाठी राजी करण्याचे काम मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी केल्याचे म्हटले जाते. 2014च्या निवडणुकांच्या वेळी अनिल देसाई, दिवाकर रावते व अनिल परब ही नेतेमंडळी युतीची बोलणी करण्यासाठी सेनेकडून पुढे होती तर भाजपाकडून आषिश शेलार, विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि ओम माथूर होते. या सर्वांना तसेच संजय राऊतांनाही बोलण्याच्या प्रक्रियेतून लांबच ठेवले होते. अशा अत्यंत गुप्त पध्दतीने या युतीला आकार देण्यात आला आहे. अर्थात काही राजकीय पक्ष आणि निरीक्षकांच्या मते युती होणारच होती. पण काँग्रेस ज्या पध्दतीने अन्य पक्षांना संभ्रमात ठेवून अखेरच्या क्षणी युती-आघाडी करते ती पध्दत यावेळी सेना-भाजपाने अवलंबिली इतकेच!

या युतीचा मोठा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य आघाडीच्या निवडणूक कामगिरीवर होणार आहे. शिवसेना भाजपाला चोर म्हणत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपण शिरजोर ठरू शकू अशी जी आशा काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना वाटत होती त्यांच्या आशेवरही पाणी पडणार आहे. सेना-भाजपा स्वतंत्र लढतील यावर त्यांची गणिते काही प्रमाणात अवलंबून होती. अर्थातच राष्ट्रवादीचे काही नेते सेना-भाजपा स्वतंत्र लढणार नाहीत असे ठामपणाने सांगत होते. तेही निरिक्षण योग्यच होते हेही या निमित्ताने दिसून आले. काँग्रेस आघाडीच्या अनेक उमेदवारांचा धीर मात्र कालच्या युतीच्या घोषणेनंतर कमी झालेला आहे. प्रत्येक मतदारसंघाचे चित्र निराळे असले तरी सेना-भाजपा एकत्र व त्यांना मोदींच्या तोफखान्याची मदत असे झाल्यास पुन्हा 2014 चेच निकाल दिसू शकतील असे त्यांना सहाजिकच वाटत आहे.

कोकणात नारायण राणेंचीही पंचाईत झाली आहे. त्यांनी काँग्रेस सोडली ती फडणवीस मंत्रिमंडळात महसूल वा उद्योग खाते घेण्यासाठीच. पण मुख्यमंत्र्यांनीदेखील सेनेच्या मर्जीशिवाय मंत्रीपद नाही हे स्पष्ट केले. नाईलाज म्हणून राणेंनी भाजपाच्या मदतीने राज्यसभेची खासदारकी मान्य केली. त्यांना मुलांसाठी व कालीदास कोळंबकरांसारख्या निष्ठावंत सहकाऱ्यांसाठी आमदारकीच्या जागा भाजपाकडून पक्क्या करायच्या होत्या. ती प्रक्रिया आता थांबणार आहे. त्यांच्यापुढे काँग्रेसमध्ये परतणे हाही एक पर्याय आहेच. पण तसे झाल्यास कमळाकडून मिळालेली खासदारकी सोडावी लागेल. पुन्हा विधानसभेच्या रणमैदनात उतरावे लागेल. शिवाय काँग्रेसमधील हुसेन दलवाईंसारखे कोकणी नेते राणेंना पुन्हा स्वीकारायला तयार होतील का हाही प्रश्नच आहे. अशोक चव्हाण आणि अजितदादा पवारांच्या मनसुब्यावरही युतीचा मोठा आघात आहे. राज ठाकरेंसाठी आता काँग्रेस आघाडीचे दरवाजे उडतील.. एकूणच भाजपा व शिवसेनेच्या निर्णयामुळे आता सर्वच पक्षांच्या राजकारणाची दिशाही बदलणार आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content