Details
चांद्रीय दक्षिण धृवाच्या दिशेने!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
एकीकडे बेंगळुरू शहर हे टोकाच्या राजकीय शह-काटशहांचे केंद्र बनलेले असावे अन् तिथेच देशाची मान जगात उंचावणाऱ्या मोहिमेचे एक महत्त्वाचे केंद्रही असावे हा योगायोगच म्हणावा लागेल. चांद्रयान – 2 मोहिमेमुळे हा योगायोग जुळला. साऱ्या देशाने अत्यंत अभिमानाने ज्या घटनेची दृष्ये डोळ्यात साठवली त्या चांद्रयान – 2 मोहिमेची सुरूवात जरी केरळमधील श्रीहरीकोटा येथून झाली असली तरी तेथून उडाललेल्या रॉकेटचे नियंत्रण व संचालन करण्याची प्रणाली बसवलेली आहे ती बेंगळुरूमध्ये. तिथल्या इस्रोचे टेलीमेट्री, ट्रॅकिंग व कमांड म्हणजेच इस्ट्रॅक केंद्रामधील शास्त्रज्ञ मंगळवारी दुपारी दोन वाजून 43 मिनिटांपासून आपापल्या जागी सावध व दक्ष होऊन बसले. आता यापुढे त्यांचेच कम सुरू झाले होते. चांद्रयानाच्या उड्डाणानंतर श्रीहरीकोटामधील शास्त्रज्ञांचा ताण नक्कीच कमी झाला असणार. पण, बेंगळुरूच्या केंद्रातील शास्त्रज्ञांना पुढचे बासष्ट दिवस हा ताण झेलायचा आहे. यातील पहिले 48 दिवस आहेत ते चांद्रयान – 2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशापर्यंत पोहोचण्याचे आहेत. त्यातील काही आठवडे हे यान पृथ्वीभोवती उंच आणि अधिक उंच असे कक्षा रूंदावत फिरणार आहे. नंतर 13 ऑगस्ट पासून 20 ऑगस्टपर्यंत चांद्रयान – 2 चा प्रवास हा चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या कक्षेपर्यंत होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरपर्यंत 100 कलोमीटर अंतरावरून चंद्रभ्रमण करत राहील. पुढच्या चार दिवसात चंद्राच्या दक्षिण धृवावर यान उतरेल. उतरतानाची शेवटी पंधरा मिनिटे शास्त्रज्ञ अक्षरशः प्रचंड तणावाखाली काम करतील. कारण त्या पंधरा मिनिटांतच चांद्रयानाचे चंद्रावर सावकाश अंवतरण होईल.
असे सावकाश चंद्रावर उतरवण्याचे काम याआधी फक्त तीन देशांनीच केले आहे. अमेरिका, रशिया व चीन. नंतर हे अतिअवघड बिरूद साध्य करणारा भारत हा जगातील फक्त चौथा देश ठरेल. 7 सप्टेंबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी लँडर विक्रम चंद्रावर उतरलेले असेल आणि नंतर चार तासांनी प्रग्यान हा रोव्हर बाहेर पडेल. खरेतर हे बिरूद आपण याआधीच काही वर्षे मिळवू शकलो असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची अडचण होती ती क्रायोजेनिक रॉकेटच्या तंत्रज्ञानावर हुकूमत मिळवणे. 1999 मध्येच आपण या तंत्रावर अधिकार संगितला असता, पण भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान मिळू नये यासाठी काही देश प्रयत्न करत होते. आपल्याला ते स्बळावर मिळवायला काही काळ गेला खरा, पण कोणत्याही जागतिक दबावांना बळी न पडता आपण तेही साध्य केलेच. 2008 मध्ये सुरूवात केल्यानंतर चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ नंतर 11 वर्षांनी आपण घेऊ शकलो. श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातून तिसऱ्या पिढीतील प्रगत अशा जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क – ३ द्वारा या चांद्रयानाने भरारी घेतली आहे.
चंद्राभोवती भ्रमण करीत राहणारे ऑर्बिटर, पृष्ठभागावर उतरणारे विक्रम नावाचे लँडर आणि फिरून माहिती गोळा करणारे प्रग्यान नावाचे रोव्हर हे तीन मुख्य घटक या चांद्रयान – 2 मध्ये आहेत. चंद्राच्या वातावरणाची, इतिहासाची, मातीची सतरा प्रकारची अत्यंत मौलिक माहिती गोळा करणारी उपकरणे घेऊन हे प्रग्यान फिरणार, हा त्यातील लक्षणीय भाग आहे. ज्ञानाच्या कक्षा रूंदावणार आहेत म्हणून त्याचे नाव हे प्रग्यान. पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते अलिकडचे डॉ. मनमोहन सिंह व आता पंतप्रधान मोदी अशा सर्वच सरकारांनी सातत्याने इस्त्रोच्या संशोधन व विकासकामांना गती दिली आहे. त्याचेच फलित म्हणजे ही चांद्र झेप होय. या साऱ्या चांद्रयान मोहिमेचे नेमके फलिक काय? कशासाठी चंद्रावर जाण्याचा, तिथून माहिती घेण्याचा खटाटोप? याचे उत्तर हे चांद्रयान मोहिमेमधून तंत्रज्ञानाची अफाट प्रगती साधली जाते यामध्ये आहे. आपण पाठवलेले आधीचे चांद्रयान 1 याचे वजन होते जेमतेम 1100 किलो. आता जे चांद्रयान उडाले त्याचे वजन आहे जवळपास 4000 किलो. त्यासाठी जे रॉकेट लागले त्याची क्षमता आणखी वाढवली गेली आहे. यापुढे अधिक जड उपग्रह आपण या रॉकेटमार्फत अवकाशात पाठवू शकू. अधिक प्रगती त्यातून साध्य होत असते.
चांद्रमोहीम हे देशाला पडलेले भव्य स्वप्न आहे असेही म्हणता येईल. जगभरात अवकाश शास्त्रज्ञ भविष्याचा वेध घेत या मोहिमा आखत असतात. आपले चांद्रयानातील प्रग्यान जेव्हा चांद्रीय दक्षिण ध्रुवाचा वेध घेईल तेव्हा तिथे माणसांना वस्ती करता येईल अशी जागा शोधली जाणार आहे. भारताच्या पहिल्या चंद्रमोहिमेनेच चंद्रावरच्या पाण्याच्या अस्तित्त्वाचा शोध लावला होता. अमेरिकेच्या नासा अवकाश संशोधन संस्थेची काही महत्त्वाची उपकरणे चांद्रयान 1 वरून नेण्यात आली होती. त्यामुळे तिथे पाण्याचा अंश आहे याचा शोध लागला होता. चांद्रयान 1 वरील उकरणांनी चंद्राच्या पृष्ठभागावर खोलवर बर्फ असणारी चाळीस विवरे शोधली होती. हा बर्फ उणे 156 डिग्री अशा अती शीत स्थितीत आहे. चंद्रावर किमान साठ कोटी घनमीटर इतके अती शीत बर्फ असावे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. नव्या मोहिमेत भारत त्याची अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न कऱणार आहे. चंद्रावरची विवरे ही दोन किलोमीटर पासून पंधरा किलोमीटर व्यासाची आहेत. तशा दोन विवरांच्या मधल्या उंच पठारावर चांद्रयान उतरवण्याचा भारतीय चमूचा प्रयत्न असणार आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावरच जगाच्या पृथ्वीच्या व्युत्पत्तीचे रहस्य दडलेले आहे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
सूर्यमालेच्या अतिप्राचीन स्थितीचे पुरावे चंद्राच्या दक्षिण धृवावर सापडण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटते. चंद्रावरच्या पाण्याचा क्रांतीकारी शोध जसा चांद्रयान 1 ने लावला तसाच जगाच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावणारे अनेक शोध चांद्रयान – 2 लावेल अशीही आशा बाळगायला हरकत नाही. चंद्र हा असा उपग्रह आहे की त्यावर हवेचे वातावरण तर नाहीच पण सौरमालेतील सर्वप्रकारचे तीव्र किरणोत्सर्ग तसेच लहानमोठ्या अशनींचा मारा चंद्रावर सतत होत असतो. त्यामुळेच तिथल्या जमिनीवर मानवी वसाहत होण्याची शक्यता धूसर आहे. पण कमीअधिक कालावधीसाठी माणसाला तिथे राहता आले तर संशोधनाचे कार्य पुष्कळ पुढे जाण्यासारखे आहे. त्यामुळे चंद्रयान 2 मोहिमेमधून अशा एखाद्या सुरक्षित गुहेचा शोध घेता येतो का हाही प्रयत्न केला जाणार आहे. ज्या ध्रुवीय प्रदेशात चांद्रयान – 2 उतरणार आहे तिथे भूपृष्ठाखाली खोलवर अशी काही गुहेसारखी विवरे असावीत. चंद्र थंड होण्याच्या आधीच्या म्हणजे काही लाख वर्षांपूर्वीच्या काळात तिथे लाव्हा रसाच्या प्रवाहांमुळे जमिनीखाली दोन किलो मीटर खोलपर्यंत जाणारी अशी गुहेसारखी विवरे असण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा नेमका शोध घेण्याचा प्रयत्न चांद्रयान – 2 करणार आहे. अशा अनेक महत्त्वाच्या शोधकार्यासाठी पुढच्या वर्षभरात चांद्रयान – 2 चंद्राच्या दक्षिण धृवावर शोधकार्य करत राहणार आहे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी