HomeArchiveचतुर भारतीय मतदाराचा...

चतुर भारतीय मतदाराचा विजय!

Details
चतुर भारतीय मतदाराचा विजय!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक दणदणित, खणखणित विजय संपादन केला आहे. भारतीय मतदार किती चतुर आहे, किती विचारी आहे, याचाही प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. भारतीय मतदाराला कोणाला कोणत्या जागी संधी द्यावी याचे पुरते भान असते. एकाचवेळी जरी तिन्ही संस्थांच्या निवडणुका झाल्या तरी लोक योग्य पण भिन्न भिन्न उमेदवाराची निवड करतात. महापालिकेसाठी ज्या पक्षाला संधी दिली त्याचीच निवड विधानसभेसाठी वा लोकसभेसाठी जनता करेल असे नाही. संधी देण्यातील असा फरक आपला मतदारराजा दाखवू शकतो, त्याचाही प्रत्यय आला. आणखी एक धडाही मिळाला की पोटनिवडणुकीच्या निकालावरून बांधलेले आडाखेही सार्वत्रिक निवडणुकीत टिकतातच असे नाही.

गेल्या वर्षी तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन राज्यांतील भारतीय जनता पक्षाची पंधरा-पंधरा वर्षांची सत्ता संपली तर राजस्थानी जनतेच्या प्रथेप्रमाणे भाजपाला सलग दुसरी संधी तिथे मिळाली नाही. विशेष म्हणजे या तीनही राज्यांमध्ये काँग्रसने सत्ता स्थापन केली. त्याआधी त्यांनी कर्नाटकात निराळे राजकारण करतानाच भाजपाच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल यांच्या शिरपेचात असे चार-चार विजयांचे तुरे खोवले गेले होते. त्यामुळे गडी जोरात होता. नाही म्हणायला काँग्रेसला ते कसब गुजरातमध्ये दाखवता आले नाही. गुजरातमध्येही चार वेळेची भाजपाची सत्ता उलथवणे शक्य आहे असे आधी वाटले होते. पण ते जमले नाही. शंभराच्या आत आमदारांची संख्या राहूनही मुख्यमंत्रीपद मात्र भाजपाने स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले.

सोळाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे तब्बल 282 खासदार निवडून आले होते. निधनामुळे अनेक तर नाना पटोलेंसारख्या खासदारांनी पक्षाचा त्याग केल्यामुळे काही जागा रिक्त झाल्या. त्या सर्व लोकसभेच्या दहा रिक्त जागांसाठी याआधी दीड-दोन वर्षांत ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्या सर्व भाजपाने गमावल्या. या सर्व घटकांची गोळाबेरीज विरोधी पक्षांनी आणि विद्वानांनी अशी केली की, “गेलेच आता मोदी-शाहंचे राज्य!” पण दिल्लीतील एअर कंडिशंड कार्यालयात बसून कॉप्यूटर बडवणाऱ्या विद्वानांना अशाच मंडळींसाठी, खान मार्केट गँग, असा नवा शब्द मोदींनी प्रचारात आणला होता, त्यांना तळागाळातील माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. सूरजीत भल्लांच्या ग्रंथाची चौकट तीच होती. त्यांचे, “सिटझन राज” ग्रंथामधील अंदाजही तंतोतंत प्रत्यक्षात उतरताना आपण पाहतोच आहोत.

2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील या ऐतिहासिक निकालांनी आता पंतप्रधान म्हणून जगात ताठ मानेने मोदींना वावरता येणार आहे. नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीतत नमूद केले होते की गेल्या पाच वर्षांत मी जेव्हाजेव्हा परदेशात गेलो तेव्हा भारताचे म्हणणे काय आहे ते परदेशी नेते नीट ऐकून घेत होते. कारण एका पूर्ण बहुमताच्या भारत सरकारचा पंतप्रधान म्हणून मी तिथे बोलत होतो. असे पूर्ण बहुमताचे सरकार देशात तीन तपांनंतर दिल्लीत सत्तेत आले होते. अशा सरकारचे भवितव्य काय असेल, निवडणुकीत जनता या सरकारला पूर्ण समर्थन देणार की नाही याकडेही जगाचे लक्ष लागले होते. भारतात 2014 पर्यंत तसेच अल्पमतातील अनेक पक्षांच्या कुबड्या घेऊन उभे राहिलेले, अडखळत चालणारे सरकार होते. पुन्हा तसेच एखादे जोडतोड करून बनवलेले सरकार येते का याकडे जगाचे डोळे लागले होते. पण देशात राजकीय क्रांती घडलेली आहे. पुन्हा एकदा संपूर्ण बहुमताचे सरकार येत आहे, हे फार महत्त्वाचे आहे.

ज्याच्या पाठी 130 कोटी जनतेचे आशिर्वाद आहेत अशा पंतप्रधानांची दखल जगात अधिक घेतली जाते असा स्वानुभव मोदींनी नमूद केला. त्यांच्या दृष्टीने या विजयाचे महत्त्व त्यामुळे अधिक आहे. हा विजय पूर्वीपेक्षा अधिक जागांसह आणि ज्या जागा जिंकल्या त्यातीलही बहुतांश ठिकाणी अधिक मताधिक्याने मिळालेला विजय आहे हेही लक्षणीय आहे. स्वतः नरेंद्र मोदी साडेसात लाखांच्या मताधिक्याने तर अमित शाहही तितक्याच मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होत आहेत. जवळपास ३०० च्या आसपास अशा दणदणित संख्येने एकट्या भाजपाचे खासदार मोदींच्या मागे राहणार आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखालील तीन डझन पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार साडेतीनशेपर्यंतच्या संख्येने उभे असलेले दिसणार आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा हा विजय आपल्याला थक्क करणारा वाटतो. पण तो त्यांच्या लेखी पूर्व निश्चित केलेला, आखून, रेखून, कोरून काढलेला विजय आहे. त्यासाठी आखणी, नियोजन त्यांनी अतिशय बारकाईने केले होते. तशी 2014 ची निवडणूकही मोदी अशाच गांभीर्याने पूर्ण तयारीने लढले. त्यांनी 2014 मध्ये प्रचारतंत्राचे थक्क कऱणारे दर्शनही देशाला घडवले होते. त्यानंतर आलेली प्रत्येक निवडणूकही या दोघांनी अतिशय गांभीर्याने लढवली आहे. एका विजयानंतर लगेचच हे नेते पुढच्या विजयाचे लक्ष्य ठरवून त्यासाठी कंबर बांधून तयार होत असत, असे आता लक्षात येते. जाणवते.

उत्तर प्रदेशातल्या मोठ्या विजयानंतर दुसऱ्या दिवशी अमित शाह ओरिसाच्या दौऱ्यावर, कर्नाटकाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या आखणीसाठी पोहोचलेले होते. भाजपाने निवडणुकीआधी जो जाहीरनामा प्रकाशित केला त्यातील मुद्द्यांचा अभ्यास सरकारी स्तरावर आधीच सुरू करण्यात आला होता. पुढच्या शंभर दिवसांत नवे मोदी सरकार काय काय कार्यक्रम हाती घेणार याची घोषणा नव्याने पंतप्रधानपदाची शपथ मोदींनी घेतल्यानंतर लगेचच केली जाईल असे दिसते. 2019 च्या निवडणूक संग्रामातील विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की देशात प्रथमच सत्तारूढ सरकारच्या बाजूने जनमताची लाट उठलेली दिसली आहे. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाला असे वाटत होते की त्यांनी जनसामान्यांसाठी उत्तम काम केले आहे. भारताची मान जगात उंचावली आहे असेही त्यांना वाटत होते. त्यामुळे तेव्हाच्या भाजपाच्या नेतृत्त्वाने शायनिंग इंडिया, अशी एक जाहिरात मोहीम आखली होती. 2004 ची निवडणूक भाजपा आरामात जिंकले असे वातावरण बनले आहे. पण मतदारांनी भाजपाचा भ्रमनिरास केला. अटल बिहारी वाजपेयींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेता आलीच नाही. मोदींचीही अवस्था तशीच होणार अशी एक आशा विरोधक बाळगून होते. 2019 हे भाजपा सरकारचे दुसरे शायनिंग इंडिया ठरणार असा प्रचार शरद पवारांसारखे नेते करत होते. 23 मे रोजी जेव्हा निकाल लागतील तेव्हा विरोधी पक्षांचेच सरकार दिल्लीत सत्तेत येताना दिसेल असे पवारांना, राहुल गांधींना, अन्य विरोधी पक्ष नेत्यांना खरोखरीच वाटत असावे. कारण चंद्राबाबू नायडूंनी गेल्या काही दिवसांत अशा काही हालचाली सुरू केल्या होत्या की असे वाटत होते की साऱ्या विरोधकांची मोट बांधून तयारच आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करण्याची खोटी की सत्तेवर युपीए तीनची उडी पडलीच!

नायडूंच्या पुढाकाराने सर्व विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत एकत्र भेटत होते. कधी नायडू चेन्नईला जात होते, कधी लखनौला धावत होते. तिकडे तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांच्याही अशाच हालचाली सुरू होत्या. ते केरळमध्ये गेले, चेन्नईलाही गेले. पण या साऱ्यांच्या आशाअपेक्षा ज्या एका मुदद्यावर आधारलेल्या होत्या तोच मुद्दा खोटा ठरला. भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, भाजपाचे संख्याबळ दोनशेच्या आत राहील आणि सर्व लहानमोठ्या भाजपेतर पक्षांची मिळून संख्या तीनशेपर्यंत पोहोचले असे जे अंदाज बांधले जात होते ते मतदारांनी साफ फोल ठरवले. सत्तारूढ सरकारच्या कामावर खूष असलेल्या मतदाराने देशात प्रमच प्रो इन्कंबन्सी लाट कशी असते ते दाखवून दिले. पण याचा अर्थ देशात सारे काही आलबेल होते का? नाही! बेकारीची समस्या होतीच व आहेही. शेतकरी अडचणीत होता व आहेही. पिण्याच्या पण्याचे संकट आ वासून उभेच आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली होती. जागतिक मंदीच्या वातावरणात भारतही संकटाच्या छायेत येण्याची शक्यता आहे. असे सारे मुद्दे आहेत. चिंता आहेत. मतदारांना जेव्हा पत्रकार प्रश्न विचारत होते तेव्हा या समस्यांप्रती जनतेची असणारी चिंता व्यक्त होतच होती. पण तरीही अशा दहापैकी आठ मतदारांनी आपण मत मात्र मोदींसाठीच देणार हे जाहीर सांगतिले होते. एक्झिट पोलनंतर त्या अंदाजांना बळकटीच मिळाली. तेच आता खरे ठरताना दिसत आहेत. सतराव्या लोकसभेसाठी जी निवडून झाली त्यातील आणखी एक मुद्दा महत्त्वाचा होता. खासदारकीच्या सर्व 542 जागांसाठी कोणता उमेदवार कुण्या पक्षाचा आहे याची फिकीर मतदारांना नव्हती. तो मोदींचा उमेदवार आहे की नाही याची चिंता मतदान केंद्रातही व्यक्त होत होती. जणू मोदी हे एकटेच सर्व जागा लढवत होते!”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content