Details
गोरेगावात उद्योगमंत्र्यांची दोन तास पायपीट
01-Jul-2019
”
पाण्याचा निचरा करण्याचे दिले आदेश
मनोहर कुंभेजकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुसळधार पावसात गोरेगावमधील नागरिकांना पूरजन्य परिस्थितीचा सामना करू लागू नये यासाठी चक्क राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शनिवारी भरपावसात पायपीट करत दोन तास येथील भागाचा पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला.
मुसळधार पाऊस आणि दुपारी आलेली भरती यामुळे गोरेगाव पश्चिम येथील शास्त्री नगर व मोतीलाल नगर येथे सुमारे 6 ते 10 इंच पाणी साचले होते. तर काहींच्या घरात पाणी शिरले होते. ही गोष्ट शिवसेनेच्या जवाहर नगर हॉलसमोरील शाखेत गोरेगावकरांना भेटण्यासाठी आलेल्या राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत साचलेल्या पाण्यातून चालत येथील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली आणि येथील पाण्याचा निचरा लवकर करण्याचे आदेश पी दक्षिण वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव व मेंटेनन्स विभागाचे सहाय्यक अभियंता अमित पाटील यांना दिले. गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.
पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा कसा करण्यात येईल यासाठी सुभाष देसाई यांनी महापालिकेचे अधिकारी यांना सोबत घेऊन शास्त्री नगर नाला, मोतीलाल नगर नाला, सिद्धार्थ नगर नाला व गटारे, मैदाने यांची पाहणी केली. पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी पंप लावा तसेच ओसंडून वाहणारा मोतीलाल नगर नाला व बेस्ट नगर नाला बघता भविष्यात या नाल्यांचे रूंदीकरण करा, घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना आसरा देण्यासाठी पालिकेच्या मोतीलाल नगर शाळेत त्यांची पर्यायी व्यवस्था करा असे आदेश उद्योगमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
उद्योगमंत्र्यांच्या आदेशाने तत्काळ भरती ओसरल्यावर 4 पंप आणि अतिरिक्त पालिकेचे कर्मचारी लावून चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पाण्याचा निचरा करण्यात आला अशी माहिती अमित पाटील यांनी दिली. उद्योगमंत्री देसाई यांनी गोरेगाव परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून सुमारे दीड हजाराहून अधिक पूरबाधित कुटुंबियांना मदत पुरविली. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्योगमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि राजू पाध्ये तसेच विधानसभा उपसमन्वयक अजय नाईक, शाखाप्रमुख संजय जयस्वाल, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, उपशाखाप्रमुख संजय भालेराव, महेंद्रा इंगवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओशिवरा नदीच्या उपनद्यांना पूर आल्याने गोरेगाव परिसरातील शास्रीनगर, सिद्धार्थनगर, प्रेमनगर व मोतीलाल नगर भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली. तेथील सुमारे दीड हजारांहून अधिक नागरिकांना पावसाचा फटका बसला. यावेळी पूरबाधितांना गुरूनानक विश्वस्त संस्था, गोरेगाव प्रबोधन तसेच स्वयंभू शंकर विश्वस्त मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी भोजनाची सोय केली. यावेळी पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. मुंबई व परिसरात पुढील चोवीस तासाच पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देसाई यांनी केले आहे.”
“पाण्याचा निचरा करण्याचे दिले आदेश