Details
गोरेगावचं बंद सिद्धार्थ हॉस्पिटल पर्यायी ठिकाणी सुरू करणार
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने बंद केलेले मुंबईतल्या गोरेगाव (प.) येथील सिद्धार्थ हॉस्पिटल पर्यायी ठिकाणी १५ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आमदार कपिल पाटील, वीरेंद्र जाधव आदींच्या शिष्टमंडळाला नुकतेच दिले.
अरविंद सावला, सुदेश सावंत, गौरव राणे, माधवी राणे, समीर मुणगेकर, राजू साटम, अजय विचारे, किरण पटेल व बंटू पटेल, रमाकांत बने आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. मॅटर्निटी होम तातडीने सुरू करण्यात येईल व त्याच जागी ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात येईल. अन्य ठिकाणी ओपीडी आणि डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण न करता दोन वर्षांत सिद्धार्थ हॉस्पिटल नव्याने बांधून पुन्हा सुरू करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने केलेल्या आंदोलनामुळे सध्या या रूग्णालयात अपघाती विभाग तसेच ओपीडी चालवले जात आहे, असे मनसेकडून सांगण्यात आले.”
“केएचएल न्यूज ब्युरो