Details
गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माधवी कुंटे
01-Jul-2019
”
श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे येत्या 30 डिसेंबर 2018 रोजी गोव्याच्या फोंडा येथे 16 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची निवड झाली आहे.
‘मी एक खलाशी’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. माधवीताईंची ही ठाम धारणा आहे की, परमेश्वरानं प्रतिभेचा एक बिंदू दिलेला असतो, जो नंतर विस्तारत जातो आणि लेखकाचा जन्म होतो. ‘सुख पाहता’ ही कादंबरी देखील लोकप्रिय झाली. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, अनुवादित पुस्तकंअशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.
माधवी कुंटेयांनी अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्याचबरोबर अनेक साहित्य संस्थांशी त्या संबंधित असून विलेपार्ले येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा लौकिक वाढविण्यासाठी त्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्यिक मूल्ये वाढीस लागावी, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. आहे या संमेलनासाठी कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार व राजीव गांधी कला मन्दिर यांचे सहकार्य लाभले आहे.”
“श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे येत्या 30 डिसेंबर 2018 रोजी गोव्याच्या फोंडा येथे 16 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची निवड झाली आहे.