Details
गोपाळ शेट्टी यांची उद्या उत्तर मुंबईत पदयात्रा!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या मतदारसंघात 150 किमी पदयात्रा करून जनजागृती करण्याचे देशातील सर्व खासदारांना सांगितले आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशभर भ्रमण करून गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्याप्रमाणे देशातील खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या संधी व जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जाऊन ते समजून घ्यावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केले आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी कंबर कसली आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ते बोरिवली पश्चिम येथून सकाळी 7.30 वाजता पदयात्रेला प्रारंभ करणार आहेत. उत्तर मुंबईतील जनतेने 4,65,248 इतक्या भरघोस मतांनी निवडून देऊन त्यांच्यावर जो जबरदस्त विश्वास दाखवला त्याची जाणीव असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या संदेशाला प्रमाण मानून येत्या 15 दिवसांत उत्तर मुंबईत 150 किमी पदयात्रा ते काढणार आहेत. या मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघातील 42 वॉर्डमध्ये अंतिम व्यक्तीपर्यंत जाऊन जनतेच्या समस्या समजून घेणार आहेत. तसेच खासदार म्हणून 5 वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखून उत्तर मुंबईतील जास्तीतजास्त समस्यांचा निपटारा करेन असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उद्या दि,15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता बोरिवली पश्चिम स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून या पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते पोयसर जिमखाना, चिकूवाडी, जॉगर्स पार्क ते वीर सावरकर उद्यान मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे या पदयात्रेची समाप्ती होईल. या पदयात्रेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमवेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, नगरसेवक प्रवीण शाह, विद्यार्थी सिंह, नगरसेविका बीना दोशी, आसावरी पाटील, अंजली रेडकर, भाजपा बोरिवली अध्यक्ष दीपक पाटणेकर, माजी महापौर मोहन मिठबावकर, भाजपाचे कार्यकर्ते, बोरीवलीतील विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.”
“केएचएल न्यूज ब्युरो