HomeArchiveखरंच, या चित्रपटांचा...

खरंच, या चित्रपटांचा लोकसभा निवडणुकीसाठी उपयोग होईल?

Details
“खरंच, या चित्रपटांचा लोकसभा निवडणुकीसाठी उपयोग होईल?”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशभरात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनकहाणीवरील चित्रपटाने धूम उठवली आहे. निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी याची निर्मिती केल्याचा आरोप होत असून काँग्रेसने आधी आम्ही चित्रपट पाहू, मग प्रदर्शित करायचं कि नाही ते ठरवू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. किंबहुना वाद करून गाजवायचा नि गल्ला भरून घ्यायचा असंही असू शकतं. कारण हल्ली हाच फंडा रूढ झाला आहे.

अलीकडेच यासह ठाकरे या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचं सादरीकरण झालं. दक्षिण भारतातही विख्यात नेते एन. टी. आर, दुसरे नेते के. सी. आर. आणि वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्यावर यात्रा असे तीन पिक्चर येऊ घातलेत. २०१६ च्या सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या उरी भागात लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याची नि नंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा असलेला उरीदेखील प्रदर्शित होतोय तर मौलाना आझाद यांच्यावरसुद्धा सिनेमा येतोय. तत्कालिन पंतप्रधान सिंह यांचे माध्यम सल्लागार असलेल्या संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर त्याच शीर्षकाने तयार झालाय. २०१४ च्या निवडणुकीत या पुस्तकाचा वापर केला गेला. यावरून वेळोवेळी काँग्रेस भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील झालेत.

चित्रपटाच्या जारी केलेल्या झलकेवरून याची कथा सोनिया-राहुल गांधी यांच्याभोवती फिरतेय असं जाणकारांचे मत आहे. प्रोमो समोर येताच लगोलग भाजपाची टीका चित्रपट हेतूबद्दल शंका उपस्थित करते. यामुळेच नियमित प्रदर्शनाआधी ज्येष्ठ नेत्यांस चित्रपट दाखविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. असे न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी तरी परिणामकारक नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
सदर चित्रपटात प्रारंभीच काल्पनिक घटनांचा समावेश असल्याचं स्पष्टीकरण असल्याने पुढील काळात चित्रपट सरकताना तितका प्रभावी नाही होत. अभिनेता अनुपम खेर यांचा अभिनय ठीकठाक तसंच अक्षय खन्ना. संवादावर चाललेल्या कैचीने हिरमोड होतो. राजकारणात रस असलेले काहीसा आनंद घेऊ शकतील असा सिनेमा.

`उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ एक थरार अनुभवायची अपेक्षा ठेऊन असलेल्याची निराशा करणारा. जी वर्णने स्ट्राईकबाबत आली त्या जवळपास ‘उरी’ जात नसल्याने `उरी’ हताशा येते. हे ऑपरेशन ज्या पद्धतीनं झालं ते चित्रित करण्यास अपयश आल्याने रोमांचकता, ती उत्कंठा पूर्ण होत नाही. वास्तवतेला सोडून गेलेल्या या चित्रपटात दमदार संवादाकडे दुर्लक्षच झाल्याच जाणकारांचे मत आहे. शिवसेनाप्रमुखांवर बनवलेल्या ठाकरेचंही काहीसं तसंच वाटतंय. पहिल्या नजरेत तरी मनोरंजनापेक्षा राजकीय लाभासाठी हा चित्रपट बनवल्याचं समोर येतंय. यावरूनही राजकीय वातावरण तापू लागलेय. कंगना राणावतचा “मनकर्णिका” त्याच दिवशी रीलीज होत असल्यानं नवा वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी प्रदर्शित होणाऱ्या अशा राजकीय चरित्रपटांमुळे कोणा नेत्याची छबी बिघडू किंवा सुधारू शकते काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही आणि तो संयुक्तिकदेखील ठरतो. यासाठी थोडी वाट पाहवी लागेल की निवडणूक परिणाम निकाल कसे येतात. या चित्रपटांचा नेमका फायदा वा नुकसान कोणाला, कसा मिळतो यासाठी. एकूणच वरील दोन चित्रपट हवा निर्माण करण्यात अपयशी ठरले असल्याचं मत तयार झालंय. याचा निवडणुकीवर परिणाम फारसा होणार नाही हे स्पष्ट दिसतेय.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content