HomeArchiveकोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर...

कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

Details
कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांच्या प्रश्नांवर नुकतीच विधान परिषदेत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मुंबई ते कांदिवलीपर्यंतच्या एकूण 29 कि.मी.च्या कोस्टल रोड संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नामुळे अनेक कोळी मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह प्रश्न मार्गी लागणार आहेत. उदा. कोस्टल रोडमुळे बाधित झालेले किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांचे पुनर्वसन तसेच आर्थिक नुकसानभरपाई आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याबाबत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी वरळी सिलिंकचा स्पॅन वाढवुन द्यावा अशी मागणी केली गेली. तसेच संपूर्ण कोस्टल भागातील सीमांकन हद्द निश्चित करुन मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

मुंबईतील 42 कोळीवाड्यापैकी 12 कोळीवड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली. त्याबाबत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content