HomeArchiveका आले कच्च्या...

का आले कच्च्या तेलाचे दर शून्यापेक्षा खाली?

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
तेलाच्या किंमती शून्यापेक्षा कमी दरावर घसरल्या यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही अभूतपूर्व स्थिती असून इतिहासात प्रथमच डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमती (मे कॉन्ट्रॅक्ट) १९० टक्क्यांपेक्षा जास्त दराने घटल्या. मागणी कमी झाल्याने तेलाच्या किंमती शून्याच्याही खाली उतरल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने मागणी घटली आणि तेलाचे उत्पादन होतच राहिले. आता जगभरातील तेलाची साठवण क्षमताच पूर्ण झाली आहे.
 
“एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी कोट्यवधी लोक घरात राहत असल्याने अमेरिकेच्या क्रूडची मागणी आटून गेली आहे. तथापि सोमवारी डब्ल्यूटीआय जून फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेच्या बाजारात २२.२५ डॉलर प्रति बॅरल या दरात होता. मे आणि जूनच्या दरातील प्रसार १९ डॉलरपेक्षा जास्त होता. दोन लगतच्या महिन्यांमधील हा फरक इतिहासात प्रथमच एवढा मोठा दिसून आला आहे.”
 
मंगळवारी (२० एप्रिल २०२०) गुंतवणूकदारांनी चिंतादायक वातावरणाच्या लाटेत कालबाह्य होणाऱ्या मे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची विक्री केली. एका क्षणाला सोमवारी अमेरिकी बाजारात कॉन्ट्रॅक्टने उणे ४० डॉलरएवढे दर दर्शवले. व्यापार थांबला तेव्हा तेलाच्या किंमतीनी उणे ३७.६३ डॉलर प्रति बॅरल एवढे दर गाठले. ही घट ३०५ % किंवा ५५.९० डॉलर प्रति बॅरल एवढी होती.
 
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाने जगभरातील इंधन मागणीत ३० टक्के घट अनुभवली. तरीही ओपेक संघटनेने तेलाचा पुरवठा सुरूच ठेवला. त्यामुळे अत्याधिक पुरवठा झाला. अनावश्यक तेल साठ्यांमध्ये जात असून अमेरिकेचे साठेही आता अपेक्षेपेक्षा जास्त गतीने भरले आहेत.
 
“अमेरिकेतील मुख्य स्टोरेज हब मागील आठवड्यातच ७० टक्के भरले होते. दोन आठवड्यात हे भरतील, असा ट्रेडर्सचा अंदाज होता. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्युचर्स करारातील तरतुदींमुळे सोमवारी अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये विक्री वाढली. तेलाचा करार संपला तेव्हा प्रत्येक होल्डरला कुशिंगला वितरित केलेल्या प्रत्येक करारासाठी १००० बॅरल तेलाचा ताबा घ्यावा लागतो. शुक्रवारी काही खरेदीदार होते आणि करार १८ डॉलर, या किंमतीवरून शून्यापेक्षा कमी किंमतीवर घसरले. एकदा ही पातळी गाठल्यानंतर विक्रेत्यांनी त्यावर सारवासारव करून १९८३मधील वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट करार सुरू केल्यापासून सर्वात वाईट दिवस म्हणून उणे ४० डॉलर प्रति बॅरलवर हा करार केला.”
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content