Details
कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!
29-Aug-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
मुंबईतील कांदिवली पूर्व येथील जनतानगर परिसरातील पूल सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसांत वाहून गेला होता त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी वळसा घालून जावे लागायचे. पूर्वी असलेल्या जागीच पादचारी पूल व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही होते. त्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती कांदिवलीतील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
पोयसर, जनतानगर पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाला. या पादचारी पुलामुळे पोयसरवासीयांना दिलासा मिळणार आहे. पोयसर नदीवर बनलेला हा पादचारी पूल म्हणजे जनतानगर आणि कांदिवली रेल्वेस्थानकाला जोडणारा दुवा होता. दररोज शेकडो नागरिक कांदिवली रेल्वेस्थानकाला जाण्यासाठी याच पादचारी पुलाचा वापर करत. आमदार भातखळकर यांनी पुढाकार घेऊन पूलनिर्मितीचा विडा उचलला. या कामातही अनेक अडचणी आल्या. हा पादचारी पूल उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक सल्लागारही नेमण्यात आला होता. नवीन पादचारी पुलाचा आराखडाही सल्लागाराने सादर केला. मात्र आराखड्याप्रमाणे काम करायचे झाल्यास एकीकडे पोयसर नदी, तर दुसरीकडे पोयसरमधल्या आखूड गल्ल्या यामुळे जागेची कमतरता भेडसावत होती. तसेच पुलाच्या बांधकामासाठी लागणारे सामान इच्छित ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, असेही ते म्हणाले.
अखेर आमदार भातखळकरांनी सीओडी प्रशासनाशी याविषयी चर्चा केली आणि सामानाची ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांना सीओडी परिसरातून मार्ग मिळवून द्यावा, अशी मागणी सीओडी प्रशासनाकडे केली. अखेर या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत सीओडी परिसरातून गाड्यांची ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आज हा पादचारी पूल सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे. या पुलामुळे आनंदित झालेल्या नागरिकांनी आमदार अतुल भातखळकरांचे आभार मानले. या लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक शिवकुमार झा आणि नगरसेविका सुनीता यादव, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html
”
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
“मुंबईतील कांदिवली पूर्व येथील जनतानगर परिसरातील पूल सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसांत वाहून गेला होता त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी वळसा घालून जावे लागायचे. पूर्वी असलेल्या जागीच पादचारी पूल व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही होते. त्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती कांदिवलीतील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.”
“पोयसर, जनतानगर पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाला. या पादचारी पुलामुळे पोयसरवासीयांना दिलासा मिळणार आहे. पोयसर नदीवर बनलेला हा पादचारी पूल म्हणजे जनतानगर आणि कांदिवली रेल्वेस्थानकाला जोडणारा दुवा होता. दररोज शेकडो नागरिक कांदिवली रेल्वेस्थानकाला जाण्यासाठी याच पादचारी पुलाचा वापर करत. आमदार भातखळकर यांनी पुढाकार घेऊन पूलनिर्मितीचा विडा उचलला. या कामातही अनेक अडचणी आल्या. हा पादचारी पूल उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक सल्लागारही नेमण्यात आला होता. नवीन पादचारी पुलाचा आराखडाही सल्लागाराने सादर केला. मात्र आराखड्याप्रमाणे काम करायचे झाल्यास एकीकडे पोयसर नदी, तर दुसरीकडे पोयसरमधल्या आखूड गल्ल्या यामुळे जागेची कमतरता भेडसावत होती. तसेच पुलाच्या बांधकामासाठी लागणारे सामान इच्छित ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, असेही ते म्हणाले.”
“अखेर आमदार भातखळकरांनी सीओडी प्रशासनाशी याविषयी चर्चा केली आणि सामानाची ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांना सीओडी परिसरातून मार्ग मिळवून द्यावा, अशी मागणी सीओडी प्रशासनाकडे केली. अखेर या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत सीओडी परिसरातून गाड्यांची ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आज हा पादचारी पूल सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे. या पुलामुळे आनंदित झालेल्या नागरिकांनी आमदार अतुल भातखळकरांचे आभार मानले. या लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक शिवकुमार झा आणि नगरसेविका सुनीता यादव, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.”
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html