Details
औटघटकेचा मतदारराजा!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांना मतदारांकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागते आणि जुन्या मतदारयाद्या बाहेर निघतात. तपासणी, छाननी सुरू होते. वॉर्डनिहाय अंदाज घेतले जातात. उजळणी होते. त्याचवेळी निवडणूक आयोग नावाची महायंत्रणा अधिकृतपणे मतदार गणना, छाननी, नव्या मतदारांची नोंदणी असे उपक्रम सुरू करते. मतदारांचा टक्का वाढला की कमी झाला, वाढला तर कितीने वाढला आणि कमी तर कितीने कमी, त्याचा आपल्या हक्काच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची उत्सुकता राजकीय पक्षांना, त्यांच्या विद्यमान लोकप्रतिनिधींना, त्या मतदारसंघातील इच्छुकांना असतेच. शिवाय, विश्लेषकांना ही आकडेवारी हवी असते. या आकडेवारीवर चार-दोन चर्चा सहज मारून नेता येतात. प्रत्यक्षात मतदार नावाचा जो घटक असतो तो मतदानाच्या वेळी राजा असतो, औटघटकेचा झाला तरी राजा असतो आणि तो भाकरी कशी फिरवतो त्यावर सर्व काही अवलंबून असतं. पण तोपर्यंत सत्तेंच्या शिंकाळ्याकडे नजर लावलेल्या सर्वच आशाळभूतांना या आकडेवारीचा आधार असतो, त्यांच्या गणितांना याच आकडेवारीतून पुष्टी मिळत असते.
भारत हा सर्वाधिक युवकांचा देश ठरणार आहे, ठरला आहे अशी चर्चा याच वर्षात सुरू झाली आहे. ही सर्वाधिक युवकसंख्या मतदारांमध्ये प्रतिबिंबित होणार, गणली जाणार आहे. हेच युवक देशाचे भवितव्य ठरवणार आहेत, ही मतदारांची नवी पिढी देशाला दिशा देणार आहे, वगैरे प्रोत्साहनपर भाषणे कधीच सुरू झाली आहेत. प्रत्येक पक्षाला या नव्या मतदारांकडून आशा आहे ती मतांची. देश, भवितव्य, प्रगतीपथावरील राष्ट्र या गोष्टी आहेतच. पण प्राधान्य आहे या तरुणाईच्या मतांना. ती मते आपल्या ताटात पडावीत अशी या पक्षांची स्वाभाविक अपेक्षा आहे. मतदारांचा टक्का देशात आणि राज्यात पण वाढला आहेच. पण मतदानापेक्षा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी बाहेरगावी जाणारे मतदार मतदानाचा टक्का किती वाढवतात यावर कुणाच्या शिंक्यातील सत्तेची खिचडी शिजणार हे अवलंबून असेल.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर २०१४ पेक्षा २६ लाख नव्या मतदारांची भर मतदारांमध्ये पडली आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या खासदारांचे भवितव्य ८.७ कोटी मतदार ठरवणार आहेत. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ७८ टक्के हे मतदार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात ३६ लाख नवे मतदार नोंदवले गेले. पण त्याचवेळी १० लाख मतदारांची नावे वगळण्याचे अर्ज आल्यामुळे नव्या मतदारांचा आकडा २६ लाखांपर्यंत असेल. हे २६ लाख मतदार तरूण किंवा पहिल्यांदाच मतदान करणारे असणार आहेत. साहजिकच या मतदारांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघातून वगळल्या जाणाऱ्या बहुतेक मतदारांची नावे ही पत्ताबदलामुळे, स्थलांतरामुळे किंवा नोंद असलेल्या पत्त्यावर मतदार राहत नसल्यामुळे वगळली जातील. हा तपशीलही राजकीय पक्षांना त्यांच्या आकडेवारीत लक्षात घ्यावा लागेल. नवे मतदार २६ लाखांच्या आसपास आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघ सुमारे १७ लाख मतदारांचा हा तपशील लक्षात घेऊन आजी-माजी लोकप्रतिनिधी, इच्छुकांना आपले आडाखे बांधावे लागतील.
या मतदारांवर लक्ष केंद्रीत करताना या नव्या मतदारांनी मतदान करावे, मतदानासाठी बाहेर पडावे यासाठीही प्रबोधन करावे लागणार आहे. निवडणूक आयोग वा सरकारच्या पातळीवर होणारे प्रयत्न होतीलच. पण, राजकीय पक्षांनाही या जनजागरणात वाटा उचलणे भाग आहे. केवळ मतदारांचा टक्का वाढून चांगले लोकप्रतिनिधी निवडले जात नाहीत. त्यासाठी जागरूक मतदार, सोशल मीडियावर अहमहमिकेने मतभेद व्यक्त करणारे मतदार मतदान केंद्रावर यावे लागतात. मतदानाचा टक्का वाढवावा लागतो. ही जबाबदारी प्रत्येक जाणत्या व्यक्तीची आहे. देशाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. अमूक एक पक्ष किंवा व्यक्तीचा बालेकिल्ला, गड, बुरूज, हक्काचा मतदारसंघ यापलिकडे जाऊन मतदारांनी यासाठी विचार करावा लागेल. राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी कधीचीच सुरू झाली आहे. अशीच मोर्चेबांधणी सर्वसामान्य नागरिकांनाही करावी लागणार आहे.
ठाणे, पालघर, कल्याण या लोकसभा मतदारसंघांचा विचार करायचा झाला तर प्रमुख राजकीय पक्षांनी या मतदारसंघातील वास्तवाचा, जनमनाचा अंदाज घेण्यासाठी व्यावसायिक संस्थांना आधीच कामाला लावले आहे. या मतदारसंघातील जातीय, धार्मिक समीकरणे, मतांची टक्केवारी, मराठा, दलित, बहुजन अशी एकगठ्ठा मते, विद्यमान लोकप्रतिनिधींची कामगिरी, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांनी केलेली कामे, तेथील जनतेचे मत, नाराजी अशा विविध मुद्द्यांवर माहिती गोळा केली जात आहे. हेच मतदारांनीही आपल्याही मनाशी पडताळून पाहायला हवे. लोकप्रतिनिधी, मतांचे आवाहन करणारे पक्ष यांची कामगिरी, दावे-आश्वासने यांची पूर्तता हेही तपासून पाहायला हवे. औटघटकेचे राजे असूही पण, संतुलित विचार करण्याचीही संधी हीच वेळ देत असते. ही संधी मतदारांनी घ्यायला हवी.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान