Details
एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे..
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
कॅन्सर, कर्करोगाचे नाव जरी काढले तरी आपल्या मनात धडकी भरते. या आजाराच्या रूग्णांना शक्यतो मृत्यू ओढवतो हा आपल्यात दृढ झालेला एक समज. मात्र कोणत्याही गंभीर आजाराचे वेळेत निदान झाले व त्यावर औषधोपचार झाले तर त्या आजाराला प्रतिबंध घालता येतो. कर्करोग हा आजार असामान्य वाढणाऱ्या शरीरातील पेशींचा समुह आहे. कोणतीही तपासणी न केल्यामुळे हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात वाढत राहतो. हा आजार कोणत्याही वयोगटात, कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरांतील लोकांमध्ये आढळतो. या आजारामुळे अकाली मृत्यूची शक्यता बळावत असल्यामुळे सर्वात धोकादायक आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच कर्करोगाचे वेळेत निदान होणेसाठी स्तन, मुख व गर्भाशयमुख या ३ अवयवांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
या अवयवांमध्ये होणाऱ्या कर्करोगाची लक्षणे पूर्वावस्थेत दिसून येतात आणि पूर्वावस्थेततून कर्करोगाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी १० ते १२ वर्षे इतका कालावधी लागतो. त्यामुळे जर त्यांचे निदान व उपचार वेळेत झाले तर कर्करोगाला निश्चितपणे आळा घतला जाऊ शकतो. आपल्या देशात सामान्यतः पुरूषांमध्ये मुखाचा, फुप्फुस, जठर, गुदाशय आणि स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशय मुखाचा, गुदाशयाचा, अंडाशयाचा आणि मुखाचा कर्करोग आढळून येतो. मुख्यत्वे पुरूषांमध्ये मुखाचा व स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग सामान्यतः आढळून येतात जे पूर्वावस्थेमध्ये ओळखता येतात. पूर्वावस्थेमध्ये या आजाराचे निदान झाल्याने त्या अनुषंगाने आवश्यक औषधोपचार करणे शक्य होते व कर्करोगासारख्या भयंकर आजाराला पायबंद घातला जाऊ शकतो.
दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन तसेच 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होत असतो. यावर्षी या दोन महत्त्वपूर्ण दिवसांचे निमित्त साधून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ८ मार्च २०१९ ते ९ एप्रिल २०१९ या कालावधीत कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर ही मोहीम आरोग्य विभागामार्फत इंडियन डेन्टल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन कॅन्सर सोसायटी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, FOGSI इत्यादी संस्थांच्या मदतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे ब्रीदवाक्य ”एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे” असे आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून स्तन, मौखिक व गर्भाशय मुख कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांची कर्करोग तपासणी करण्यात येत आहे.
कर्करोगाव्यतिरिक्त सर्व महिला लाभार्थ्यांची मधूमेह व उच्च रक्तदाब तपासणीदेखील करण्यात येत आहे. ८ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या माहिमेसाठी ठराविक वेळापत्रक सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना आखून देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार शासनाच्या विविध खात्यांमधील अधिकारी व कर्मचारी यांची सामान्यतः आढळणाऱ्या कर्करोगाची तपासणी करण्यात येत आहे. याची व्यापक प्रसिध्दी व जनजागृती स्थानिक वर्तमानपत्रे, रेडिओ, लोकल केबल नेटवर्कवर करण्याबाबतच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. सामान्यतः आढळून येणाऱ्या कर्करोगांमध्ये महिलांमधील स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग व मौखिक कर्करोग तसेच पुरूषांमध्ये आढळणारा मौखिक कर्करोग यांचा समावेश होतो. स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग व मौखिक कर्करोग यांची प्रारंभिक अवस्थेत तपासणी करणे शक्य आहे आणि प्रारंभिक अवस्थेत त्याचे निदान झाल्यास या आजारातून बरे होण्याचे प्रमाण ७० ते ७५ टक्के आहे.
राज्यात ही मोहीम 3 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात ३० वर्षे व त्यापुढील स्त्रियांमध्ये आढळून येणारे स्तन व गर्भाशयमुख कर्करोग आणि स्त्री व पुरूषांमध्ये आढळून येणारा मौखिक कर्करोग यांची तपासणी (स्क्रिनींग) करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात संशयित आढळलेल्या रूग्णांचे निश्चित निदान करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यावर रूग्णांवर उपचार सुरू करण्यात येतील. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे स्क्रिनींग करण्यात येणार असून उपकेंद्रांवर दर दिवशी ३० रूग्णांची तपासणी आरोग्यसेविका (ए.एन.एम.), बहुउददेशीय आरोग्य कर्मचारी (एमपीडब्ल्यू) यांच्यामार्फत करण्यात येईल. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, ह्रदयरोग व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १६ जिल्हयांमध्ये कर्करोगाची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्यामुळे कर्करोगाच्या निदानाचे ध्येय गाठणे आरोग्य विभागाला शक्य होणार आहे. कर्करोगाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न होताना दिसत असून कर्करोगविरोधी मोहिमेला सर्व स्तरांतील घटकांचा पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कॅन्सरला कॅन्सल करूया
जीवनाला स्वस्थ बनवूया”
“वैभव मोहन पाटील