Details
उमेदवार आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यावेळचीच! – मधु चव्हाण
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दुसऱ्या पक्षातील उमेदवार भारतीय जनता पार्टीत स्वतःहून येत आहेत. ही उमेदवारांची पळवापळवी नाही. उमेदवारांना स्वतःच्या पक्षात घेण्याची परंपरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेपासून सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते यशवंतराव मोहिते यांना काँग्रेस पक्षाच्या घेऊन पक्ष वाढविण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे मानसपुत्र शरद पवार यांनीही ही परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कार्यक्रम आवडला म्हणून इतर पक्षातील ज्येष्ठ भाजपात येत असतील तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूक : २०१९, ही वार्तालाप मालिका आयोजित केली आहे. त्यात मधु चव्हाण बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मधु चव्हाण यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी देशात विकासाची कामे केली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आज एकटा पडला आहे. सन २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ३०० हून अधिक निरपराध माणसांना मारले. त्यात आमचे आघाडीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळकर आणि अशोक कामटे मारले गेले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने निषेधाचे पाकिस्तानला पत्र पाठविले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्काराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण दुर्दैव असं की, राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा मोदी यांच्याकडे पुरावा मागत आहेत. इतर विरोधी पक्षही पुरावा मागत आहेत. परंतु जनमानसात याबाबत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असेही मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो