HomeArchiveउमराव जान अदा!...

उमराव जान अदा! जान फिदा!!

Details
उमराव जान अदा! जान फिदा!!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
“आशाजी अशा तयारीने गायल्या आहेत की जणू उमराव जानच्या गळ्यातूनच सूर उमटतायत आणि रेखाने तर उमराव जान अक्षरश: जिवंत केली.. उमराव जान एक स्वप्न होतं, रूपेरी पडद्यावर. आशाजींच्या आवाजाने ते आणखी बेहतरीन सजून आलं..”

बुजूर्ग संगीतकार खय्याम सांगत होते.. त्यांच्याच तर संगीताने मिर्जा हादी रूसवा यांची उमराव जान अदा रूपेरी पडद्यावर अफलातून खुलून आली होती. १८९९ मधली ही कथा. उर्दूतील पहिलीवहिली कादंबरी समजली जाते. १९ व्या शतकातील फैजाबादमधील एक नर्तिका आणि शायर उमराव हीची ही कथा.

या कथेवर पाकिस्तानातही चित्रपट बनला आणि भारतातही. भारतात दोनवेळा नव्हे तीनवेळा. गाजले ते दोनच. खय्याम यांनी संगीत दिलेला, आशाजींच्या आवाजाची मखमली पाखर घालणारा. मुजफ्फर अलीने दिग्दर्शित केलेला. रेखाने घायाळ करून सोडलं होतं त्यात फारूक शेखच्या नवाबाला आणि समोरच्या प्रेक्षकांनाही. त्यानंतर आला जे. पी. दत्ताचा ऐश्वर्या राय, अभिषेकचा उमराव जान. आणि आता याच कथेवर आलंय उमराव जान अदा हे म्युझिकल नाटक..

एक भव्यदिव्य प्रॉडक्शन. फिरता रंगमंच, एलईडी, व्हीडिओ स्क्रीन्स, स्पेशल इफेक्ट्स.. सर्व काही. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी संगीत नाटकं असतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष रंगमंचावर गाणारे कलाकार. कथक नृत्यपरंपरेत पारंगत नृत्यांगना, हिंदी, इंग्रजी स्टेज गाजवणारे कलाकार, सलीम-सुलेमान मर्चंट या प्रख्यात जोडीने दिलेला संगीतसाज, सुप्रसिद्ध कथक नर्तिका पूजा पंत यांची कोरिओग्राफी आणि आणखी बरंच काही.. बियाँड बॉलिवूड – द वेस्टएन्ड म्युझिकल, या गाजलेल्या सांगितिकेची निर्मिती करणाऱ्या कंपनीनेच उमराव जान अदा,ची निर्मिती केली आहे.

याच नव्या उमराव जान अदा म्युझिकलचा प्रिमियर वांद्रे येथील रहेजा ऑडिटोरियममध्ये हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत, टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध कलाकार, सोनू निगम, तलत अझिझ, तौफिक कुरेशी यांच्यासारखे दिग्गज यांच्या उपस्थितीत पार पडला. खय्यामसाहेबांना या कार्यक्रमासाठी अगत्याने मानाचे आमंत्रण देण्यात आले होते. या म्युझिकलला आशीर्वाद देताना खय्यामसाहेबांनी उमराव जान चित्रपटातील अजरामर गाणी आणि संगीताविषयी स्मरणरंजन केलं.

ग्रॅव्हिटी झिरो एन्टरटेनमेन्टची निर्मिती असलेल्या या उमराव जान अदा सांगितिकेचे दिग्दर्शन राजीव गोस्वामी यांनी केले आहे. यातील काही गाणी इरफान सिद्दीकी यांनी लिहिली आहेत. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात या हिंदी संगीत नाटकाचे प्रयोग नवी दिल्लीत रंगणार आहेत. प्रिमियर शो अर्थातच अफलातून रंगला. एक उत्तम नाट्याविष्कार, नृत्याविष्कार, जबरदस्त तयारीची गायकी अशा सगळ्याचाच संस्मरणीय अनुभव या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनावर गारूड करून गेला.

भारतीय नाट्यनिर्मितीला स्टेजवरील प्रत्यक्ष संगीतसाज आणि गायनाचा वेगळा आयाम देणारे हे सादरीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे, असे संगीतकार सुलेमान मर्चंट यांनी यावेळी सांगितले. गझल, ठुमरी, कथकमधील नजाकत थेट सादरीकरणातून अनुभवण्याचा विलक्षण योग या नव्या उमराव जान अदा म्युझिकलमुळे जुळून आला आहे. मनकर्णिका, बाजार, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या प्रतिभा बघेल या अभिनेत्री-गायिकेने उमराव जानची भूमिका केली असून अभिनेते निर्णय सिंह, हरिष मोयल यांनी नबाब सुलतानची भूमिका केली आहे. दिया और बाती हम मालिकेतील मीनाक्षी विक्रम राठी या नकारात्मक भूमिकेतील कनिका महेश्वरी यांनी खानूम जान यांची भूमिका केली आहे. सुशांत वसिष्ठ यांनी गौहर मिर्जा तर, सोहम जोशी यांनी गुलाम मुस्तफा आणि फकिर यांची भूमिका केली आहे. कृष्णकली सहा यांनी बडोदेवाली बाई यांची भूमिका केली आहे. हे सर्वचजण जबरदस्त तयारीचे गायक आहेत. कथक विशारद अपूर्वा शिर्के, सुनयना बद्रिके, प्रणाली काळकर, निधी नायर, वैशाली पोतदार, श्वेतांबरी पोतदार यांच्यासह अनेक नृत्यांगनांची आकर्षक नृत्ये ही या म्युझिकलची जमेची बाजू आहे. उमराव जान अदा, जान फिदा, अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया या प्रयोगानंतर प्रत्येकाच्या मुखातून उमटत होती.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content