Details
इटलीच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडे सरस
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
इटलीतील सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात अभिषेक देशपांडेने सात गुणांची कमाई करीत उपविजेतेपद पटाकावले. या स्पर्धेत ‘ब’ गटात खेळताना अभिषेक देशपांडेने नऊ डावांत सात गुण मिळवले. सात गुणांवर टाय झाल्याने अभिषेकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अभिषेकने अग्रमानांकित फिडे मास्टर व्हॅलन्टी व जाइल्स (फ्रान्स) या अनुभवी खेळाडूंवर मात केली. महत्त्वाच्या डावांमध्ये अभिषेकने अॅलबिनी फेडरिको व माँड्युकी मिरको यांच्यावर विजय नोंदवत आगेकूच केली होती. सात गुणांसह त्याने उपविजेतेपद संपादन केले.
इटलीतील दुसऱ्या क्वीन ऑफ कॅटोलिका बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेकने आठवे स्थान मिळवले. तसेच त्याने फिडे मास्टर पालोझ्झा ख्रिस्तियन, व्ही. अॅटिंनो यांना पराभूत केले. या कामगिरीमुळे त्याने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटाकावला. जर्मनीतील खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेने सहावे स्थान मिळवले. या स्पर्धेत तो ग्रँडमास्टरच्या गटात खेळला होता. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रियाच्या स्पाइसबर्गर गेहार्ड व युक्रेनच्या केमेनस्की डिमॅट्रो यांना नमवले होते. अभिषेक ने मिळविलेल्या या यशाबद्दल साऊथ मुंबई चेस अकॅडमीचे (south mumbai chess academy) प्रमुख जी. बालाजी यांनी अभिनंदन केले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो