HomeArchiveआयुष मिशनच्या माध्यमातून...

आयुष मिशनच्या माध्यमातून देशभर आयुर्वेद उपचार योजना

Details
आयुष मिशनच्या माध्यमातून देशभर आयुर्वेद उपचार योजना

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
भारतीय चिकित्सा क्षेत्रात आयुर्वेदाला अग्रस्थान देण्यासाठी तसेच योगसारख्या प्रकारातून आरोग्य जोपासण्याचा प्रचार अशा विविध माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार असून हा एक राष्ट्रीय आयुष मिशनचा भाग राहील तसेच याअंतर्गत विविध योजनादेखील संपूर्ण देशभर कार्यान्वित करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने ते बोलत होते. कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील आयुर्वेदातील मान्यवर अभ्यासक, संशोधक या परिषदेत सहभागी झाले. याप्रसंगी मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबेळकर, आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली, पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी, आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम, कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील उपस्थित होते.
 
 
 
 
 
मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबेळकर यांनी गर्भसंस्कार ते अंत्यसंस्कार हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा विचार करणारी भारतीय संस्कृती सुजाण व सुप्रजातीसाठी विचार करते, त्यामुळेच आशियातील कुटुंबियांचा प्रभाव जागतिक कारभारात वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विविध माध्यमातून दिसून येतो. म्हणूनच अशी पिढी घडविण्यासाठी जनचळवळ जाणीवपूर्वक उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.
 
 
आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आपण उत्तम वैद्य कसे होऊ, याचा निर्धार केला पाहिजे तसेच उपचाराची स्वतःची पद्धतीदेखील विकसित केली पाहिजे, तरच आयुर्वेदाला अधिक बळकटी येईल तसेच जनमानसातदेखील त्याचा अवलंब करण्यावर भर पडेल, असे विचार आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
 
या परिषदेत आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. डॉ. बनवारीलाल गौड व डॉ. एन. आर. भांगळे यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. आयुर्वेदात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृष्णा मित्रा, प्रदीप बाबर, विजय माने, संजय लोंढे, कौशलकुमार सिंग, संजय चिट्टे यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड़ॉ. सुजाता देवईकर यांनी केले तर आभार पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक गोविंद खटी यांनी मानले. सूत्रसंचालन अमृता मिश्रा यांनी केले. डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांनीही या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“भारतीय चिकित्सा क्षेत्रात आयुर्वेदाला अग्रस्थान देण्यासाठी तसेच योगसारख्या प्रकारातून आरोग्य जोपासण्याचा प्रचार अशा विविध माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार असून हा एक राष्ट्रीय आयुष मिशनचा भाग राहील तसेच याअंतर्गत विविध योजनादेखील संपूर्ण देशभर कार्यान्वित करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.”
 
 
“कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने ते बोलत होते. कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील आयुर्वेदातील मान्यवर अभ्यासक, संशोधक या परिषदेत सहभागी झाले. याप्रसंगी मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबेळकर, आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली, पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी, आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम, कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील उपस्थित होते.”
 
 
 

 
 
“मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबेळकर यांनी गर्भसंस्कार ते अंत्यसंस्कार हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा विचार करणारी भारतीय संस्कृती सुजाण व सुप्रजातीसाठी विचार करते, त्यामुळेच आशियातील कुटुंबियांचा प्रभाव जागतिक कारभारात वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विविध माध्यमातून दिसून येतो. म्हणूनच अशी पिढी घडविण्यासाठी जनचळवळ जाणीवपूर्वक उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.”
 
 
“आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आपण उत्तम वैद्य कसे होऊ, याचा निर्धार केला पाहिजे तसेच उपचाराची स्वतःची पद्धतीदेखील विकसित केली पाहिजे, तरच आयुर्वेदाला अधिक बळकटी येईल तसेच जनमानसातदेखील त्याचा अवलंब करण्यावर भर पडेल, असे विचार आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली यांनी व्यक्त केले.”
 
 
 
 
 
“या परिषदेत आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. डॉ. बनवारीलाल गौड व डॉ. एन. आर. भांगळे यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. आयुर्वेदात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृष्णा मित्रा, प्रदीप बाबर, विजय माने, संजय लोंढे, कौशलकुमार सिंग, संजय चिट्टे यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड़ॉ. सुजाता देवईकर यांनी केले तर आभार पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक गोविंद खटी यांनी मानले. सूत्रसंचालन अमृता मिश्रा यांनी केले. डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांनीही या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.”

भारतीय चिकित्सा क्षेत्रआयुर्वेदाकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईकवरळीकश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनगर्भसंस्कार ते अंत्यसंस्कार

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content