HomeArchiveआमच्या सोसायटीसमोरील टोलेजंग...

आमच्या सोसायटीसमोरील टोलेजंग इमारत..

Details
आमच्या सोसायटीसमोरील टोलेजंग इमारत..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
गप्पा मारता मारता
भुर्रकन उडून जावा वेळ
तशी आमच्या सोसायटीसमोर उभी राहिली
माझ्या डोळ्यासमोर टोलेजंग इमारत.

कुठे गेली असेल त्या इमारतीसाठी
डोक्यावरून विटा वाहणारी ती बाई
जिला पेटवायची होती चूल म्हणून
ती उन्हाला घ्यायची डोक्यावर?
उपाशी राहिली तरी
ढळू द्यायची नाही पदर
मुकादमासमोर उभी राहताना
किंचित झुकवायची मान
डावलायची पुरुषी डोळे
नुसत्या नजरेनं कोणत्याही बाईचं वजन उचलणारे
तिला नव्हता मागचा पुढचा कोणताच इतिहास
बनणारही नव्हता कधीच तिचा इतिहास.

 

ज्या हातांनी उभी केली ही टोलेजंग इमारत
त्या इमारतीच्या सावलीत
घटकाभर उभं राहून ती रंगवू शकत नाही स्वप्नं
तिचा मुलगाही नाही “दिवार”मधला विजय
जो आईसाठी खरेदी करू शकतो
मुँहबोल्या किंमतीत आख्खी इमारत
किंवा
“मदर इंडिया”मधील बंडखोर बिरजू.

त्या इमारतीकडं पाहताना
प्रत्येकवेळी मला दिसतो
इमारतीसमोरून सरकत जाणारा निर्वासितांचा तांडा.”
 
“भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
गप्पा मारता मारता
भुर्रकन उडून जावा वेळ
तशी आमच्या सोसायटीसमोर उभी राहिली
माझ्या डोळ्यासमोर टोलेजंग इमारत.

कुठे गेली असेल त्या इमारतीसाठी
डोक्यावरून विटा वाहणारी ती बाई
जिला पेटवायची होती चूल म्हणून
ती उन्हाला घ्यायची डोक्यावर?
उपाशी राहिली तरी
ढळू द्यायची नाही पदर
मुकादमासमोर उभी राहताना
किंचित झुकवायची मान
डावलायची पुरुषी डोळे
नुसत्या नजरेनं कोणत्याही बाईचं वजन उचलणारे
तिला नव्हता मागचा पुढचा कोणताच इतिहास
बनणारही नव्हता कधीच तिचा इतिहास.

 

ज्या हातांनी उभी केली ही टोलेजंग इमारत
त्या इमारतीच्या सावलीत
घटकाभर उभं राहून ती रंगवू शकत नाही स्वप्नं
तिचा मुलगाही नाही “दिवार”मधला विजय
जो आईसाठी खरेदी करू शकतो
मुँहबोल्या किंमतीत आख्खी इमारत
किंवा
“मदर इंडिया”मधील बंडखोर बिरजू.

त्या इमारतीकडं पाहताना
प्रत्येकवेळी मला दिसतो
इमारतीसमोरून सरकत जाणारा निर्वासितांचा तांडा.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content