HomeArchiveआपडो पॉली!

आपडो पॉली!

Details
आपडो पॉली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
कपिल देवने नुकतेच एक विधान केले. तो म्हणाला, `धोनी इतकी भारतीय क्रिकेटची सेवा कोणीच केली नाही.’ कपिलचे म्हणणे काही अंशी खरेदेखील असेल. या पार्श्वभूमीवर आपण पॉली उम्रीगर यांना विसरून कसे चालेल? मैदानात आणि मैदानाबाहेर उम्रीगर आयुष्यभर क्रिकेटसाठी झटत राहिले. त्यांना बीसीसीआयचा प्रतिष्ठित असा सी. के. नायडू पुरस्कार 1998 साली तर तितकाच प्रतिष्ठित असा कॅस्ट्रोल पुरस्कार 2001 साली प्रदान करण्यात आला. उम्रीगर यांच्या स्मरणार्थ बीसीसीआयने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी असलेला पुरस्कार ठेवला आहे. त्याशिवाय वानखेडे स्टेडियमवरील `पॉली उम्रीगर गेट’ हा त्यांच्या हयातीत झाला. या संदर्भात उम्रीगर यांच्या सभ्यतेचा आणि संयमी व सौजन्यशील स्वभावाचा एक किस्सा नमूद करण्यासारखा आहे. 2002 साली भारत विरूद्ध इंग्लंड हा एक दिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. उम्रीगर या सामन्यासाठी गेले. पण त्यांच्या नावे असलेल्या गेटवरच त्यांना अडविण्यात आले. सुरक्षारक्षक त्यांना आत सोडण्यास तयार होईनात. पण या घटनेमुळे ते संतापले नाहीत. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला असा सल्ला दिला की, अशा महत्त्वाच्या सामन्याच्या वेळी कमिटीचा एक सदस्य गेटवर ठेवावा. म्हणजे तो जुन्या क्रिकेटपटूंना ओळखू शकेल.

उम्रीगर हे 1962 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यावेळी सर्वाधिक कसोटी सामने (59) खेळलेले ते एकमेव भारतीय क्रिकेटपटू होते. विक्रमवीर सुनील गावसकर यांनी त्यांचा विक्रम मोडण्याआधी 12 कसोटी सामन्यात 3,631 धावा करण्याचा विक्रम उम्रीगर यांच्या नावे होता. तो अनेक वर्षे अबाधित होता. उंच आणि धिप्पाड असे उम्रीगर क्रिकेटमधील प्रशासक म्हणूनदेखील यशस्वी ठरले. बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्या काळात कोणताही परदेशी संघ भारतात आला की, वेळ-काळ न पाहता रात्री-अपरात्री उम्रीगर त्या संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर जात. 1978-79 ते 1981-82 या चार मोसमांत ते राष्ट्रीय निवड समितीचे चेअरमन होते. याच काळात भारताने आपल्या भूमीवर वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना खडे चारले. तर 1980-81 सालची ऑस्ट्रेलियातील मालिका अनिर्णित ठेवली. पण किवीलॅण्ड येथील न्यूझीलॅण्डसमोर मात्र भारताला पराभव पत्करावा लागला. याच दौऱ्यात दिलीप दोशी अनफिट ठरल्यामुळे त्याच्या जागी अचानक भारतातून कोवळ्या रवि शास्त्रीला पाठविण्यात आले.

70 च्या दशकात दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होते. तेव्हा दर रविवारी सकाळी उम्रीगर दूरदर्शनवर नवोदितांना क्रिकेटचे धडे देत. त्यांची क्रिकेट शिकविण्याची पद्धतदेखील अनोखी होती. आमचे भाग्य असे की, आम्ही तेरा वर्षांचे असताना पॉली उम्रीगर यांनी आम्हाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सोळा वर्षांखालील मुलांच्या उन्हाळी क्रिकेट शिबिरात दाखल करून घेतले. तेथे केणी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुनील गावसकर यांच्याकडूनदेखील आम्हाला क्रिकेटचे धडे मिळाले. वानखेडे स्टेडियम निर्माण होत असताना पॉली उम्रीगर सतत जातीने तेथे हजर असत. त्यांच्याच देखरेखीखाली हे भव्य-दिव्य स्टेडियम उभे राहिले. आयुष्याच्या संध्याकाळी उम्रीगर कॅन्सरने ग्रस्त होते. पण आपल्या वेदना त्यांनी इतरांना कळू दिल्या नाहीत. वरळी समुद्र किनाऱ्यावर एकदा त्यांची भेट झाली असता त्यांनी आम्हाला पाहून आनंद व्यक्त केला. त्यानंतर मात्र उम्रीगर आम्हाला कधीच भेटले नाहीत. पारशी असलेल्या उम्रीगरांना त्यांचे ज्ञाती बांधव `आपडो पॉली’ (आपला पॉली) असे म्हणत. पण ते केवळ पारशी लोकांचेच नव्हे तर सर्वांचेच लाडके पॉली होते.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content