HomeArchiveआदित्य ठाकरेंनी साधला...

आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

Details
आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील कामआपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भूमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मनोज कोटक यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे सांगितले. गेला महिनाभर आम्ही सर्वजण महायुतीचा प्रचार करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीने शाखेवर जाऊन गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आल्याचे कोटक यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content