Details
.. आणि म. गांधी दिल्लीत अवतरले!
03-Oct-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
दिल्लीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ दस्तुरखुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी आल्याची ब्रेकिंग न्यूज देशात टीव्हीवर झळकल्यावर खळबळ माजली. गांधींना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधींपासून अनेक नेते धावले. त्यावेळी त्यांच्यात झालेला संवाद (काल्पनिक)..
राजशिष्टाचाराचा नियम तोडून राहुल गांधी यांनी गांधीना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना सुरक्षारक्षकांनी अडविले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधींना भेटण्यास परवानगी दिली. नरेंद्र मोदी गांधींना भेटतात..
गांधी: नरेंद्रजी तुमचे अभिनंदन! (हे ऐकून मोदी गोंधळले..)
मोदी: गांधीजी, कशाबद्दल माझे अभिनंदन?
गांधी: जगातील महाशक्ती, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी तुम्हाला भारताचे राष्ट्रपिता म्हणून जाहीर केले.
मोदी: त्यावेळी मीही गोंधळलो होतो बापूजी. ते असे का बोलले हे मलाच कळले नाही.
गांधी: असू दे, असू दे.. देशात राष्ट्रपिता मी एकटा असणे हे घराणेशाहीसारखे आहे, बरोबर ना? मी एकट्यानेच ठेका घेतला आहे का, राष्ट्रपिता होण्याचा? कोणीही होऊ शकतो? काय नवीन चाललंय तुमचं?
मोदी: चंद्रावर यान पाठविले आहे..
गांधी: व्वा, छान.. मी खेड्याकडे चला सांगितले, तुम्ही चंद्राकडे चालले आहात..
मोदी: बापूजी, तुमचा गैरसमज झालेला दिसतोय..
मी तुमची आवडती ‘स्वछता मोहीम’ देशात यशस्वी करून दाखविली आहे. ग्रामीण भागातील गरिबांना गॅस सिलेंडर दिलेत. पंतप्रधान आवास योजनेखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन लाखांत घरे देत आहे..
गांधी: छान, छान.. आणि काय?
मोदी: आपले ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे स्वप्न पूर्ण होत आहे. (हे ऐकताच पाठीमागे उभे असलेल्या राहुल गांधींनी सदऱ्याचे हात वर करत काहीतरी बोलणार इतक्यात सोनियाजींनी त्यांचा हात पकडला..)
गांधी: ठीक आहे.. काँग्रेस पक्ष बरखास्त करायचे हे माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद..
मोदी: बापू हूँ जाऊ छूँ..
गांधी: हिंदीतून बोला.. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे.. (मोदींनी यावर काहीच न बोलता बापूंना नमस्कार करत काढता पाय घेतला.. आणि सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी बापूंजवळ आले)..
सोनिया: बापूंना सुताचा हार घालत नमस्कार केला. मी सोनिया गांधी..
गांधी: इंदिरेची सून ना? (राहुल गांधी बाह्या वर करत म्हणाले.. हो) तुम्ही हिंदीतून का बोलत नाही..
राहुल: बापूजी, माझी आई इटलीची आहे. तिला हिंदी येत नाही.
गांधी: पण, त्या हिंदीतून भाषण चांगल्या करतात.. (सोनियांना हायसे वाटलं..)
सिंह: व्हॉट हॅपन नो.. (सोनिया गांधींनी सिंह यांना थांबवले)
राहुल: बापूजी, आम्ही काँग्रेस पक्ष सावरण्याची बराच पराकाष्ठा केली, पण..
गांधी: काँग्रेस हा पक्ष नेहरू-गांधी घराण्याचा पक्ष होता. त्याचा ऱ्हाहास होणार याची कल्पना मी मरण्यापूर्वीच दिली होती.. झाले तेच बरे झाले. राहुलजी तुम्ही ‘चौकीदार चोर है, हे मोदींना बोललात.. देशाच्या पंतप्रधानाला असे बोलणे शोभते का? माझ्या नावाने राज्य केले आणि माझेच विचारांचं असं ‘आचार’ (लोणचं) घातलं. हीच का ती काँग्रेस संस्कृती?
(तेवढ्यात प्रियंका व रॉबर्ट वडेरा येतात. ते बापूंना नमस्कार करतात)..
सोनिया: ही माझी मुलगी व हे जावई..
गांधी: छान, छान.. जावई काय करतात?
प्रियंका: त्यांचा बिझनेस आहे.. जमिनीचा व्यवहार करतात..
गांधी: म्हणजे दलाली करतात! (दलाली हा शब्द ऐकून सोनिया व इतरांना घाम फुटला.. आणि बापूंकडे न बघता ते निघून गेले.. हे सगळे जातात व अमित शाह येतात..)
शाह: बापू, हूँ नमस्कार करू छुँ..
गांधी: हिंदिमा वात करो, मारो भाय..
शाह: हिंदीमे.. ना बापू. एम वात ना करो, मारी वाट लागशे..
गांधी: हिंदीमे बोलो.. ही आपली राष्ट्रभाषा आहे..
(अमितजी, घाम पुसत..)
शाह: बापूजी, मी ‘एक देश, एक भाषा’ ही नुकतीच घोषणा केली आणि दक्षिणेकडून प्रचंड विरोध झाला. देशाचे तुकडे होतात की काय असं मला वाटू लागलं.
गांधी: ठीक आहे.. पण, देशाचे तुकडे होता कामा नये. लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंघ केला तुम्ही तसं काम करा..
शाह: म्हणून तर बापू, आम्ही वल्लभभाई यांचा मोठा पुतळा उभारला आहे..
गांधी: त्याला किती खर्च आला?
शाह: बापूजी खर्च सोडा.. नेहरूंनी काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून ३७० कलम लागू केलं होतं. ७० वर्षे पाकिस्तान त्याचा लाभ उठवत होता. काश्मीर स्वतंत्र केला.. त्यामुळे काँग्रेसचे सर्व राज्यांत पानिपत झाले..
गांधी: (काही न बोलता.. शेजारी असलेल्या तांब्यातील पाणी पितात..) शाह यांना जाण्यास सांगतात.
(महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण बापूंना भेटायला येतात.. शाह केव्हा बाहेर जातात याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. ते गेल्यावर चटकन आत येतात)
पृ. चव्हाण: नमस्कार बापूजी. (ते बापूंना सुताचा हार घालतात). बापूजी मी बरेच वर्षे नेहरू-गांधी घराण्याची सेवा केली. म्हणजे तुमच्या काँग्रेसची सेवा केली.
गांधी: काय म्हणालात? नेहरू-गांधी घराण्याची सेवा केली? काँग्रेसची नाही म्हणजे..
अ. चव्हाण: बापूजी मी अशोक चव्हाण. माझे वडील शंकरराव चव्हाण. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होते. आम्ही दोघांनी गांधी घराण्याची अखंडित सेवा करून काँग्रेस पक्षासमोर एक ‘आदर्श’ उभा केला आहे.
गांधी: हां. कळलं, कुलाब्याला आदर्श इमारत उभी केली, तो आदर्श म्हणता का? (अशोकराव पुरते गर्भगळीत झाले. त्यांना सावरत आणि गांधींना खुश करण्यासाठी ते पुढे सरसावले)
पृ. चव्हाण: मी सोनिया गांधी यांच्या सांगण्याप्रमाणे महाराष्ट्रातील सहकारी बँकेतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रशासक नेमले आणि त्यातल्या भ्रष्ट नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे.
गांधी: पण, मोदींना जे जमले ते तुम्हाला काँग्रेसला का जमले नाही?
पृ. चव्हाण: तेच मी तुम्हाला सांगतो.. (एवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात.. त्यांच्याकडे पाहत पृथ्वीराज व अशोक चव्हाण बाहेर पडतात.)
देवेंद्र: बापूंना नमस्कार करत जय भारत, वंदे मातरम.. जोराने म्हणतात. बापू, काँग्रेसला जे जमले नाही, ते आम्ही तुमच्याबाबत करणार आहे..
बापू: अरे बाबा, त्या नथुरामाने माझी सुटका केली. आता काय करणार?
देवेंद्र: आम्ही, महाराष्ट्रात तुमचा पुतळा उभा तयार करणार आहोत. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल आणि महाराष्ट्रात महात्मा गांधी.. कसं?
गांधी: हे कशाला?
देवेंद्र: बापूजी, आपली स्वातंत्र्य चळवळीची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आणि आपले महाराष्ट्रावर प्रेम होते हे लक्षात घेऊन मलबार हिलचे कमला पार्क हटवून तुमचा भव्यदिव्य पुतळा उभारणार आहोत. (शेजारी असलेले आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी देवेंद्रजींच्या हळूच कानात जिना हाऊसच्या जागी पुतळा उभा करणार म्हणून सांगा.. असे सुचवितात)
गांधी: काय म्हणतात, ते?
देवेंद्र: हे आमचे लोढा.. ते म्हणतात की तुमचा पुतळा पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांच्या बंगल्याची रिकामी जागा आहे, त्या जागेवर तुमचा भव्य पुतळा उभारावा..
गांधी: नाही, नाही.. माझा पुतळा उभारला नाही चालेल, पण जिनासाहेबांच्या बंगला उध्वस्त होता कामा नये..
(बापू हातात काठी घेऊन निघून गेले. तरातरा निघून गेले.. देवेंद्रजी व मंगल प्रभात या दोघांवर कसला तरी लोढ आल्यागत वाटत होतं..)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार”
jayant.s.karanjavkar@gmail.com
“दिल्लीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ दस्तुरखुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी आल्याची ब्रेकिंग न्यूज देशात टीव्हीवर झळकल्यावर खळबळ माजली. गांधींना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधींपासून अनेक नेते धावले. त्यावेळी त्यांच्यात झालेला संवाद (काल्पनिक)..”
राजशिष्टाचाराचा नियम तोडून राहुल गांधी यांनी गांधीना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना सुरक्षारक्षकांनी अडविले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधींना भेटण्यास परवानगी दिली. नरेंद्र मोदी गांधींना भेटतात..
गांधी: नरेंद्रजी तुमचे अभिनंदन! (हे ऐकून मोदी गोंधळले..)
“मोदी: गांधीजी, कशाबद्दल माझे अभिनंदन?”
“गांधी: जगातील महाशक्ती, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी तुम्हाला भारताचे राष्ट्रपिता म्हणून जाहीर केले.”
मोदी: त्यावेळी मीही गोंधळलो होतो बापूजी. ते असे का बोलले हे मलाच कळले नाही.
“गांधी: असू दे, असू दे.. देशात राष्ट्रपिता मी एकटा असणे हे घराणेशाहीसारखे आहे, बरोबर ना? मी एकट्यानेच ठेका घेतला आहे का, राष्ट्रपिता होण्याचा? कोणीही होऊ शकतो? काय नवीन चाललंय तुमचं?”
मोदी: चंद्रावर यान पाठविले आहे..
“गांधी: व्वा, छान.. मी खेड्याकडे चला सांगितले, तुम्ही चंद्राकडे चालले आहात..”
“मोदी: बापूजी, तुमचा गैरसमज झालेला दिसतोय..”
मी तुमची आवडती ‘स्वछता मोहीम’ देशात यशस्वी करून दाखविली आहे. ग्रामीण भागातील गरिबांना गॅस सिलेंडर दिलेत. पंतप्रधान आवास योजनेखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन लाखांत घरे देत आहे..
“गांधी: छान, छान.. आणि काय?”
मोदी: आपले ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे स्वप्न पूर्ण होत आहे. (हे ऐकताच पाठीमागे उभे असलेल्या राहुल गांधींनी सदऱ्याचे हात वर करत काहीतरी बोलणार इतक्यात सोनियाजींनी त्यांचा हात पकडला..)
गांधी: ठीक आहे.. काँग्रेस पक्ष बरखास्त करायचे हे माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद..
मोदी: बापू हूँ जाऊ छूँ..
“गांधी: हिंदीतून बोला.. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे.. (मोदींनी यावर काहीच न बोलता बापूंना नमस्कार करत काढता पाय घेतला.. आणि सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी बापूंजवळ आले)..”
सोनिया: बापूंना सुताचा हार घालत नमस्कार केला. मी सोनिया गांधी..
गांधी: इंदिरेची सून ना? (राहुल गांधी बाह्या वर करत म्हणाले.. हो) तुम्ही हिंदीतून का बोलत नाही..
“राहुल: बापूजी, माझी आई इटलीची आहे. तिला हिंदी येत नाही.”
“गांधी: पण, त्या हिंदीतून भाषण चांगल्या करतात.. (सोनियांना हायसे वाटलं..)”
सिंह: व्हॉट हॅपन नो.. (सोनिया गांधींनी सिंह यांना थांबवले)
“राहुल: बापूजी, आम्ही काँग्रेस पक्ष सावरण्याची बराच पराकाष्ठा केली, पण..”
“गांधी: काँग्रेस हा पक्ष नेहरू-गांधी घराण्याचा पक्ष होता. त्याचा ऱ्हाहास होणार याची कल्पना मी मरण्यापूर्वीच दिली होती.. झाले तेच बरे झाले. राहुलजी तुम्ही ‘चौकीदार चोर है, हे मोदींना बोललात.. देशाच्या पंतप्रधानाला असे बोलणे शोभते का? माझ्या नावाने राज्य केले आणि माझेच विचारांचं असं ‘आचार’ (लोणचं) घातलं. हीच का ती काँग्रेस संस्कृती?”
(तेवढ्यात प्रियंका व रॉबर्ट वडेरा येतात. ते बापूंना नमस्कार करतात)..
सोनिया: ही माझी मुलगी व हे जावई..
“गांधी: छान, छान.. जावई काय करतात?”
प्रियंका: त्यांचा बिझनेस आहे.. जमिनीचा व्यवहार करतात..
गांधी: म्हणजे दलाली करतात! (दलाली हा शब्द ऐकून सोनिया व इतरांना घाम फुटला.. आणि बापूंकडे न बघता ते निघून गेले.. हे सगळे जातात व अमित शाह येतात..)
“शाह: बापू, हूँ नमस्कार करू छुँ..”
“गांधी: हिंदिमा वात करो, मारो भाय..”
“शाह: हिंदीमे.. ना बापू. एम वात ना करो, मारी वाट लागशे..”
गांधी: हिंदीमे बोलो.. ही आपली राष्ट्रभाषा आहे..
“(अमितजी, घाम पुसत..)”
“शाह: बापूजी, मी ‘एक देश, एक भाषा’ ही नुकतीच घोषणा केली आणि दक्षिणेकडून प्रचंड विरोध झाला. देशाचे तुकडे होतात की काय असं मला वाटू लागलं.”
“गांधी: ठीक आहे.. पण, देशाचे तुकडे होता कामा नये. लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंघ केला तुम्ही तसं काम करा..”
“शाह: म्हणून तर बापू, आम्ही वल्लभभाई यांचा मोठा पुतळा उभारला आहे..”
गांधी: त्याला किती खर्च आला?

