HomeArchiveआज होणार अरविंद...

आज होणार अरविंद गोखलेंच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम

Details
आज होणार अरविंद गोखलेंच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार अरविंद गोखले यांच्या साहित्यावर आधारित तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणाऱ्या अरविंद गोखले अष्टपैलू व्यक्तिमत्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने होत असून रविवार दिनांक 23 जून 2019 या दिवशी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. नीला उपाध्ये, डॉ. गिरीश दाबके, जयंत पवार, नम्रता कडू, रोहिणी गोखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

अरविंद गोखले यांच्या साहित्याची अनोखी पर्वणी तसेच त्यांच्या कथेचे दृकश्राव्य स्वरूपासह सादरीकरण रसिकांना अनुभवता येईल म्हणून अधिकाधिक साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150.

‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात १९३५ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बऱ्याच कथा, नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरवेळ ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे युरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. ’अमेरिकेस पाहवे जाऊन’ हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content