Details
अशी युती विरळच..
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पालघर मतदारसंघात खासदार म्हणून राजेंद्र गावित यांनी काम केलेले आहे. ८/१० महिन्यांचा त्यांचा अनुभव आहे. आमची युती झाल्यामुळे या मतदारसंघात इतर कोणी घेण्यापेक्षा मी गावित यांनाच शिवसेनेत घेऊन पालघर लोकसभेचे तिकीट देत आहे. अशी युती जगात एखादीच असेल ज्यात जागाही घ्या आणि उमेदवारही घ्या इतके एकमत होत असेल. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांची उमेदवारी शिवसेनेतर्फे मी जाहीर करत आहे. साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांचीही उमेदवारी मी जाहीर केली आहे, शिवसेनेच्या आता सर्व २३ उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आणि सेना-भाजपा युती किती भक्कम आहे हे स्पष्ट केले.
आठ महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत दाखल होऊन पोटनिवडणुकीत खासदार झालेले राजेंद्र गावित यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाबरोबरच गाजलेल्या पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास वनगा यांना डावलून शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली.
मंगळवारी दुपारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, श्रीनिवास वनगा आणि राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवबंधन बांधत ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. प्रवेशानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना गावित म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील प्रवेशाबाबतची सूचना केली. त्यानंतर युतीचा उमेदवार होण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर लोकसभा मतदारसंघ हा जागावाटपात शिवसेनेकडे आहे. गेल्या पोटनिवडणुकीत मी जाहीरपणे सांगितले होते की मला श्रीनिवासला संसदेत पाठवायचे होते. तो माझा शब्द आजही कायम आहे. मात्र, या दरम्यानच्या काळात श्रीनिवासनीसुद्धा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. श्रीनिवास तिथे काम करत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवासला असे वाटले की त्याला अजून तिथे काम केले पाहिजे. आधी मी विधिमंडळात काम करतो. मग पुढे कसे ते ठरवू, असे त्याने सांगितले. माझा त्याला दिलेला शब्द आहे तो आहेच. आता श्रीनिवासला विधिमंडळात काम करण्याची इच्छा असेल तर मी त्याला कोणत्याही मार्गाने विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही.
आजही माझ्या मनावर दडपण आहे, कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे की एखाद्याला शब्द देताना विचार करून दे. एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे. हीच आमच्या कुटुंबियांची, शिवसेनेची ओळख आहे. श्रीनिवास वनगा यांनी इच्छा व्यक्त केली की मला विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे. तशी त्यांनी माझ्याकडून कमिटमेन्ट घेतली नसली तरी मी त्याला कमिटमेंट देत आहे की मी त्याला विधिमंडळात कोणत्याही मार्गाने पाठवेन, असेही त्यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो