HomeArchiveअलक..

अलक..

Details
अलक..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा
[email protected]
अलक.. म्हणजेच अति लघु कथा.. एक नवाकोरा साहित्य प्रकार!

देवावर भरोसा..

तिने भिंतीकडेला आपली स्कुटी उभी केली. कुबड्या सावरत तो अरुंद परंतु वर्दळीचा रस्ता पार केला.आपलं धार्मिक साहित्य विक्रीचं दुकान उघडलं. उदबत्ती पेटवून देवाला दाखवली. ते पाहून पाय आपसूक तिच्या दुकानाकडे वळले. तिच्या विक्रीची भवानी करून द्यावी या इच्छेतून. मी उदबत्तीच्या पुड्याचे पैसे देताना विचारलं, “किती कष्टातून तुम्ही दुकान,चालवताय? कसं जमवता इतकं सारं? देवावर भरोसा, देव कोणाचं वाईट करतो का कधी? ती उत्तरली..

तो वृध्द..

तो वृद्ध गॅलरीत सकाळपासून बसला होता. आतून खूप सारे आवाज येत होते. ताज्या पदार्थांचे वासही मिसळलेले असे. त्याला एक ग्लास पाणी अन् एक कप चहा हवा होता. हातातलं वृत्तपत्र केव्हाचंच चाळून झालं होतं. आता फक्त पानांची चाळवाचाळव! नऊ, वाजले तसे सगळे आपापल्या कामास निघून गेले. तो हळूहळू किचनकडे जात राहिला.

तो वाघ..

आपल्या खोपटातल्या खाटेवर गोधडीतल्या अंथरुणात निवांत पडलेल्या वाघाला पाहून तो दचकलाच. दोघं नजरेत नजर घालून पाहत राहिले. हक्काच्या जाणीवेला भाषेची अडचण येत नसावी.
तो- हे माझं घर.. इथं आमचं जंगल होतं. आमचा अधिवास चालत आलाय..
वाघ- पण आमची कितीक पिढ्यांची वस्तीय..
तो कुरकुरला.
वाघ फक्त मिशीत हसला..

जाड चोचीचा कावळा..

तो जाड चोचीचा, लाल डोळ्याचा, गडद कुट्ट रंगाचा कावळा. कर्र, कर्र लावून करकरत होता. ती थांबावी म्हणून चपातीचा घास ठेवला. पलिकडून काही फुटांवर, भुरकट, काळसर पंखांचा सामान्य कावळा आशाळभूतपणे दृष्टी लावून होता. दांडगटाच्या धास्तीने जागीच खिळून असलेला. दांडगट लाल डोळ्याची मागणी सुग्रासाची असावी. तो कर्कश कर्रकर्रत राहिला अन् उडून गेला. धाकमुक्त सामान्य कावळा हळूहळू पुढे आला. मुकाट चपातीचा घास खाऊ लागला…

उंचीचा ध्यास..

पण, आता अधिक उंच उडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं त्या पक्ष्याला. उंचीचा हव्यास आयुष्यभराचाच होता. जित्याची खोड! हव्यास फार काळ खाली राहू देत नाही कोणाला. ‘उन, वारा, पाऊस – घरटी बांधा करा निवारा, यातच आषुष्य सरलं. सारी कर्तव्य उरकली आपण तरी.. पिल्लंही जगली. ती उडून गेली सारी.. आताशी कशातच राम नाही वाटत. राजस, सुंदरतेचं लक्षण असं एक पिस होतं. पंखांवर दिलं सोडून खाली. ठेवील कोणी तरी असलंच आपलं खाली तर आठवण म्हणून! .. आणि तो अतिउंची गाठू लागला, परत खाली न येण्यासाठी..”
 
“सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content