HomeArchiveअर्थसंकल्पाचा अर्थ!

अर्थसंकल्पाचा अर्थ!

Details
अर्थसंकल्पाचा अर्थ!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वरूप लोकानुयायी असणार हे अपेक्षितच होते. प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या आघाडीवर अजिबात अपेक्षाभंग केलेला नाही. मध्यमवर्ग, असंघटीत कामगार, शेतकरी या साऱ्यांसाठीच त्यांनी भरघोस घोषणांचा वर्षाव केला. अर्थात हा वर्षाव येणाऱ्या निवडणुकांकडे नजर ठेवूनच झाला आहे. काही राज्यांत अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये याच वर्गाच्या नाराजीचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीने खाल्ला होता. यातूनच बहुदा भाजपाने आजवर दुर्लक्षित मध्यमवर्गाला चुचकारण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली असावी.

शेतकऱ्यांमध्येही भाजपाविषयी प्रचंड असंतोष आहे. अर्थात याचा सर्वस्वी दोष भाजपाला देता येणार नाही. पण आहे तो असंतोष दूर करण्यासाठी भाजपाने अर्थसहाय्याचे प्यादे पुढे सरकवले आहे. मात्र महिन्याला पाचशे आणि दिवसाला सुमारे १७ रूपये अशा अर्थसहाय्याचा कर्जाच्या दरीत बुडालेल्या शेतकऱ्यांना कितपत उपयोग होईल याबद्दल साशंकताच आहे. शिवाय या सहा हजार रूपयांसाठी बँक खात्यांत किमान शिल्लक ठेवण्याचा भूर्दंड शेतकऱ्याला सहन करावा लागणार आहे तो वेगळाच.

याआधीची आश्वासने, घोषणा यांच्या पूर्ततेचे प्रगतीपुस्तक पाहिले तर या घोषणांबद्दल लोकांमध्ये जो संभ्रम दिसतो आहे तो साहजिकच म्हणावा लागेल. शिवाय महसुली उत्पन्नावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपयांचा भरभक्कम बोजा टाकणाऱ्या या वित्तीय घोषणांच्या पूर्ततेची जबाबदारी निवडणुकीनंतर मेमध्ये सत्तारूढ होणाऱ्या नव्या सरकारवर असणार आहे. मतदारांना आकृष्ट करताना गोयल यांनी सटरफटर उधळपट्टी करण्याचे भान मात्र दाखवले आहे. अर्थात नव्या सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात या सर्व घोषणांचा फेरविचार होईल हे नक्की!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content