HomeArchiveअभ्यासाबरोबर आरोग्यही महत्त्वाचे!

अभ्यासाबरोबर आरोग्यही महत्त्वाचे!

Details
अभ्यासाबरोबर आरोग्यही महत्त्वाचे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
शालांत परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या. परीक्षा म्हटले की विद्यार्थी व पालक यांना प्रचंड दडपण व घरात एक प्रकारचे तणावपूर्ण वातावरण असते. राज्य माध्यमिक (एसएससी) व उच्च माध्यमिक विभागाच्या (एचएससी) परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षांना बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. परीक्षा म्हटले की विद्यार्थी कितीही हुशार असला तरी थोडे टेन्शन येतेच. त्यात दहावी-बारावीची वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी सर्व शक्तीनिशी या परीक्षेची तयारी करण्यात व्यग्र आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी यासारख्या शाखांची दारे इथूनच पुढे उघडत असल्याने शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने मुले अगदी झोकून देऊन अभ्यासात मग्न असल्याचे चित्र पाहयला मिळते. वर्षभर मुले मन लावून अंतिम परीक्षेची तयारी करत असतात. मात्र वर्षभर तयारी केल्यानंतर ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे आजारपण जर आडवे आले तर? कल्पनाही करवत नाही ना! हा विचार करूनच विद्यार्थी व पालकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असणार. मात्र अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपले आरोग्यदेखील तितक्याच तळमळीने जपले पाहिजे.

अभ्यास, परीक्षा, दैनंदिन वेळापत्रकाच्या गडबडीत मुले आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात व ऐन परीक्षेच्या वेळी प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्याने मागे पडतात. बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही परिस्थिती उद्भवते. वर्गात व इतर परीक्षांमध्ये हुशार व अग्रेसर असणारी मुले मग अंतिम परीक्षेत तब्येत ठीक नसल्याने पेपर व्यवस्थित सोडवू शकत नाहीत. परीक्षा व अभ्यासाचा नको तितका ताण सध्याची मुले घेताना दिसतात. प्रचंड अभ्यास करण्याच्या इर्षेने दैनिक वेळापत्रकात बदल करतात. रात्री उशिरापर्यंत जागरण करत अभ्यास करणे, रात्रीचे जेवण उशिरा व अवेळी करणे, अभ्यासाकरिता जागे राहण्यासाठी चहा, कॉफी यासारख्या उत्तेजक पेयांचे वारंवार सेवन करणे, अनियमित व्यायाम व शारीरिक हालचाली ह्या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतो. रात्री उशिरापर्यंत जागल्याने सकाळच्या वेळी मरगळल्यासारखे वाटणे, निरुत्साही वाटणे, जागरणाचा त्रास होणे, ऍसिडिटीसारख्या समस्या उद्भवणे, अपचन, पोटात दुखणे, मळमळ, समरणशक्ती मंदावणे यासारख्या कुरबुरी वाढतात व त्याचा थेट परिणाम परीक्षेतील पेपर सोडवण्यावर होतो.

परीक्षागृहात प्रकृतीने साथ न दिल्याने इच्छा असूनही पेपर सोडवण्यात अडचणी येतात व पूर्ण शैक्षणिक वर्षात हुशार असणारी मुले परीक्षेच्या निकालात मात्र मंदावतात. ह्या सर्व बाबी या ठिकाणी मांडण्याचा उद्देश विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करण्याचा मुळीच नाही. मात्र मुलांनी अभ्यासाबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे पर्याप्त लक्ष देण्याची आवश्यकता यामधून अधोरेखित करू इच्छितो. वेळच्या वेळी जेवण, जेवणात तेलकट, तिखट न खाता हलका आहार, कमीतकमी जागरण, पहाटेचा अभ्यास, थोडा शारीरिक व्यायाम या सर्व बाबी आपल्या बुद्धीवर व परीक्षेतील कौशल्यावर नक्कीच परिणाम करतील. या बाबी आपण कटाक्षाने पाळल्या तर आपला वर्षभराचा अभ्यास व मेहनत वाया जाणार नाही. केलेल्या अभ्यासाची केवळ उजळणी करावी व प्रसन्न मानसिकतेत पेपर सोडवावेत. मुलांच्या पालकांनीदेखील त्यांचेवर अधिक दडपण न आणता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली पाहिजे. परीक्षा कालावधीत अभ्यासाबरोबरच आरोग्य हादेखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे पालकांनी अगोदर स्वतःच्या व पाल्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे व त्यादृष्टीने योग्य काळजी घेतली पाहिजे. मुलांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षा कालावधीत मोबाईल, टीव्ही, अनावश्यक गप्पाटप्पा यासारख्या गोष्टींबरोबरच शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटकांपासून तसेच सवयींपासून दूर राहिले पाहिजे.

कोणत्याही दिव्यातून जाण्यासाठी आधी आपले शरीर सुदृढ असले पाहिजे. शरीर निरोगी, सशक्त, सुदृढ व प्रसन्न असेल तर सर्व जबाबदाऱ्या आपण यशस्वीपणे पेलू शकतो. अभ्यासात आवश्यक असणारी स्मरणशक्ती तल्लख राहण्यासाठी शरीर व मनाला फार त्रास देऊन जमणार नाही. आरोग्याने उत्तम असणारी मुलेच अभ्यासात प्रगती करतात व पुढे जातात. त्यामुळे मुलांनी वाईट व्यसने व कुसंगती यापासून चार हात लांब राहणेच चांगले. व्यायाम, वाचन, वेळच्यावेळी आहार व अभ्यास यांचे यथायोग्य पालन करणे हिताचे आहे. सध्या सुरू असलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व मुलांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपली अभ्यासाची तयारी पूर्ण झालीच असणार. मात्र तब्येतदेखील उत्तम ठेवून अभ्यास व आपल्या मेहनतीला न्याय द्या व परीक्षेला सामोरे जा. यश तुमचेच असेल. पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content