Details
`अभिव्यक्ती’तर्फे कार्यशाळा..
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. हीच भूमिका अधिक बळकट करून सामाजिक परिवर्तनाला दिशा देण्यासाठी अभिव्यक्ति ही सामाजिक संस्था माध्यम व संवाद या क्षेत्रात गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहे. लोकव्यवहारात माध्यमांचा वापर आणि माध्यम व्यवहारात लोकांचा सहभाग वाढावा या उद्द्येशाने लोकांच्या गरजांबद्दल संवेदनशील असणाऱ्या माध्यमांना पुढे आणण्यासाठी व माध्यमांचा वापर वाढविण्यासाठी अभिव्यक्तीने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
अभिव्यक्तिने आजवर विविध शैक्षणिक-सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत माध्यमांचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना माध्यमसाक्षर आणि चिकित्सक केले आहे. समाजासोबत काम करीत असताना कार्यकर्त्याला प्रशिक्षणातून शास्त्रशुद्ध माहिती मिळते, नवीन दिशा आणि ऊर्जा मिळते. आजपर्यंत अभिव्यक्तिने संवाद कौशल्य, नेतृत्त्वकौशल्य, लेखनकौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सुजाण पालकत्व, लिंगभाव, दस्ताऐवजीकरण, फिल्म मेकिंग अशा विविध विषयावर यशस्वीपणे प्रशिक्षणं घेतली आहेत. कार्यकर्ते त्यांचा कामात या प्रशिक्षणाचा उपयोग करत आहे हे त्यांचे यश आहे. यावर्षीही संस्थेने सामाजिक संस्था – संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी संस्था बांधणी, अहवाल लेखन व दस्तऐवजीकरण आणि सुजाण प्रशिक्षणाच्या वाटेवर या तीन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर आपली नाव नोंदणी करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfaCbJEt3zSRKSxRQK0rYEX_q37XxLgHbg4IXNTaWzPAyXFWQ/viewform?vc=0&c=0&w=1″
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. हीच भूमिका अधिक बळकट करून सामाजिक परिवर्तनाला दिशा देण्यासाठी अभिव्यक्ति ही सामाजिक संस्था माध्यम व संवाद या क्षेत्रात गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहे. लोकव्यवहारात माध्यमांचा वापर आणि माध्यम व्यवहारात लोकांचा सहभाग वाढावा या उद्द्येशाने लोकांच्या गरजांबद्दल संवेदनशील असणाऱ्या माध्यमांना पुढे आणण्यासाठी व माध्यमांचा वापर वाढविण्यासाठी अभिव्यक्तीने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
अभिव्यक्तिने आजवर विविध शैक्षणिक-सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत माध्यमांचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना माध्यमसाक्षर आणि चिकित्सक केले आहे. समाजासोबत काम करीत असताना कार्यकर्त्याला प्रशिक्षणातून शास्त्रशुद्ध माहिती मिळते, नवीन दिशा आणि ऊर्जा मिळते. आजपर्यंत अभिव्यक्तिने संवाद कौशल्य, नेतृत्त्वकौशल्य, लेखनकौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सुजाण पालकत्व, लिंगभाव, दस्ताऐवजीकरण, फिल्म मेकिंग अशा विविध विषयावर यशस्वीपणे प्रशिक्षणं घेतली आहेत. कार्यकर्ते त्यांचा कामात या प्रशिक्षणाचा उपयोग करत आहे हे त्यांचे यश आहे. यावर्षीही संस्थेने सामाजिक संस्था – संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी संस्था बांधणी, अहवाल लेखन व दस्तऐवजीकरण आणि सुजाण प्रशिक्षणाच्या वाटेवर या तीन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर आपली नाव नोंदणी करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfaCbJEt3zSRKSxRQK0rYEX_q37XxLgHbg4IXNTaWzPAyXFWQ/viewform?vc=0&c=0&w=1”