Details
अनिल बिलावा का टाइम आ गया! मंजिरी भावसार ठरली मिस मुंबई!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दोन महिन्यांपूर्वी नवोदित मुंबई श्री स्पर्धेद्वारे हर्क्युलस जिमचा अनिल बिलावा पहिल्यांदाच शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला होता. त्यापूर्वी त्याचे नाव कुणाच्याही परिचयाचे नव्हते. पण त्याने करामात करत ते जेतेपद पटकावले. त्यानंतर तो पुन्हा गायब झाला आणि थेट स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी आला. तेव्हा त्याला पाहून उपस्थितांचे डोळे विस्फारले होते. जेव्हा तो 80 किलो वजनी गटात उतरला तेव्हा तो संभाव्य विजेत्याच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या सुशील मुरकरपेक्षा सरस असल्याचे सर्वांनीच पाहिले. तेथेच बिलावाच बाजी मारणार हे स्पष्ट झाले होते.
स्पर्धेत प्रत्येक गटात तगडे खेळाडू होते. त्याचा गट तर सर्वात अनपेक्षित होता. पण बिलावाच्या भीमकाय देहयष्टीपुढे कोणीच टिकला नाही आणि नवोदित मुंबई श्री पाठोपाठ मुंबई श्री जिंकण्याचा पराक्रमही केला. भास्कर कांबळी उपविजेता ठरला तर निलेश दगडे तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्रीच्या महिलांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत मंजिरीने तळवलकर्सच्या हीरा सोलंकीवर मात करीत आपले पहिलेवहिले मिस मुंबई जेतेपद संपादले. 52 वर्षांची निशरिन परिख तिसरी आली. या स्पर्धेत चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या आमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मऱ्हाटमोळ्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.
परळच्या रेल्वे वर्पशॉपच्या मैदानात मुंबईकरांना शरीरसौष्ठवाचे सौंदर्य आणि थरार एकाचवेळी अनुभवता आले. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सहाही खेळाडूंमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रत्येक गटात गटविजेता निवडताना जजेसना तारेवरची कसरत करताना कंपेरिजन घ्यावी लागली. 55 किलो वजनी गटात वक्रतुंड जिमच्या नितीन शिगवणने माँसाहेब जिमच्या जितेंद्र पाटीलवर मात केली. 60 किलो वजनी गटात परब फिटनेसच्या देवचंद गावडेचे कडवे आव्हान आर.एम. भटच्या अविनाश वनेने मोडून काढले. वसंत जिमचा उमेश गुप्ता 65 किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले तर 70 किलो वजनी गटात बाल मित्र व्यायामशाळेच्या रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करत गटविजेतपदावर आपले नाव कोरले. 75 किलो वजनी गटात ग्रेस जिमच्या भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
80 किलो वजनी गटात संघर्षच संघर्ष
80 किलो वजनी गट हा या स्पर्धेतला सर्वोत्तम गट होता. या गटातील सहाही खेळाडू अव्वल स्थानाचे दावेदार होते. पण नवोदित मुंबई श्रीच्या विजेत्याने संभाव्य विजेत्या सुशील मुरकर, सुशांत रांजणकर यांना मागे टाकण्याचा पराक्रम करत बाजी मारली. गेले दोन महिने एकही स्पर्धा न खेळलेला अनिलची शरीरयष्टी पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
स्पार्टन मुंबई श्री 2019 च्या अंतिम फेरीचा निकाल
55 किलो वजनी गटः 1. नितीन शिगवण (वक्रतुंड), 2. जितेंद्र पाटील (माँसाहेब), 3. राजेश तारवे (माँसाहेब), 4. नितेश कोळेकर (परब फिटनेस), 5. अजिंक्य पवार (बाळ व्यायाम मंदिर), 6. ओंकार आंबोकर (बॉडी वर्पशॉप)
60 किलोः 1. अविनाश वने (आर.एम.भट), 2. देवचंद गावडे (परब फिटनेस), 3. आकाश घोरपडे (करमरकर जिम), 4. अरूण पाटील (जय भवानी), 5. चेतन खारवा (माँसाहेब), 6. तुषार गुजर (माँसाहेब)
65 किलोः 1. उमेश गुप्ता (वसंत जिम), 2. संदेश सकपाळ (परब फिटनेस), 3. जगदीश कदम (बॉडी वर्पशॉप), 4. बप्पन दास ( आरकेएम), 5. साजिद मलिक (फ्युचर फिटनेस), 6. निलेश घडशी (बॉडी वर्पशॉप)
70 किलोः 1. रोहन गुरव (बाल मित्र व्यायामशाळा), 2. संदीप कवडे ( एच.एम.बी. जिम), 3. महेश पवार (हर्क्युलस जिम), 4. मनोज मोरे (बाल मित्र व्यायामशाळा), 5. विशाल धावडे(बाल मित्र व्यायामशाळा), 6. गणेश पेडामकर (बॉडी वर्पशॉप)
75 किलोः 1. भास्कर कांबळी (ग्रेस जिम), 2. मोहम्मद हुसेन (परब फिटनेस), 3. अमोल गायकवाड (मिशन फिटनेस), 4. अर्जुन पुंचिकुर्वे (गुरूदत्त व्यायामशाळा), 5. लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), 6. आशिष लोखंडे (रिसेट फिटनेस).
80 किलोः 1. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), 2. सुशील मुरकर (जे.एम.के.एम), 3. सुशांत रांजणकर (आर.एम. भट), 4. मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), 5. सुयश पाटील (इन्सेन फिटनेस), 6. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन)
85 किलोः 1. सकिंद्र सिंग (फॉर्च्युन फिटनेस),2. दिपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 3. उबेद पटेल (बिस्ट हाऊस जिम), 4. सुबोध यादव (बॉडी वर्पशॉप), 5. रोमियो बॉर्जेस (परब फिटनेस), 6. निशांत कोळी (वेगस जिम)
90 किलोः 1. महेश राणे (बालमित्र जिम), 2. प्रसाद वाळंज ( बॉडी वर्पशॉप), 3. विजय यादव (परब फिटनेस),
90 किलोवरीलः 1. निलेश दगडे (परब फिटनेस), 2. रविकांत पाष्टे (परब फिटनेस),
फिजीक स्पोर्ट्स (पुरूष-170 सेंमी)- 1. महेश गावडे ( आर.के.एम.), 2. विजय हाप्पे (परब फिटनेस), 3. प्रथमेश बागायतकर (परब फिटनेस),4. अनिकेत चव्हाण (रिजिअस जिम), 5.मोहम्मद इजाझ खान (आर.के.एम.), 6. लवेश कोळी (गुरूदत्त व्यायामशाळा).
फिजीक स्पोर्ट्स (पुरूष-170 सेंमीवरील)- 1. शुभम कांदू ( बालमित्र), 2. आतिक खान (फॉर्च्युन फिटनेस), 3. स्वराज सिंग (मेंगन जिम), 6. अनिकेत महाडिक (हर्क्युलस), 4. मिमोह कांबळे (न्यूयॉर्प जिम), 5. प्रणिल गांधी (फॉर्च्यून फिटनेस)
मिस मुंबई (विमेन्स फिजीक स्पोर्टस्)- 1. मंजिरी भावसार (एफएसटी जिम), नीना पंजाबी, 2. हीरा सोलंकी (तळवलकर्स जिम) 5. वीणा महाले (बॉडी वर्पशॉप), 4. रेणुका मुदलीयार (आर.के. फिटनेस), 3. निशरीन पारीख, 6. प्रतीक्षा करकेरा (बालमित्र व्यायामशाळा)
स्पार्टन मुंबई श्री- अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), उपविजेता – भास्कर कांबळी (ग्रेस जिम), तृतीय क्रमांक- नीलेश दगडे (परब फिटनेस).”
“केएचएल न्यूज ब्युरो