HomeArchiveअण्णाभाऊ साठे यांना...

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

Details
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content