Details
अंधेरीचा राजा महाकालेश्वर मंदिरात!
06-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरांचे हुबेहूब देखावे साकार करणाऱ्या मुंबईतल्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीने यंदा मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केला असून ८.५ फूटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती येथे विसावली आहे. नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला दररोज हजारो गणेशभक्त महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येतात. सर्वच सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र याला अंधेरी पश्चिम आझादनगर मेट्रो स्टेशन जवळ असलेला अंधेरीचा राजा अपवाद आहे. अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन होते. यंदा अंधेरीच्या राजाचे ५४वे वर्ष आहे.
१९६६ साली गोल्डन टोबॅको, टाटा स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीच्या कामगारांनी आझादनगर उत्सव समितीच्या माध्यमातून अंधेरीच्या राजाची स्थापना केली होती. १९७३ साली येथील आझादनगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबँको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ दे म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला आणि कारखाने परत सुरू झाले. त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते अशी माहिती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.
अंधेरीच्या राजाचा प्रत्येक दिवसाचा धोतर व शाल हा पेहराव अमेरिकेतील प्रसिद्ध बॉलीवूड फॅशन डिझायनर साई सुमन साकारत आहेत. यंदा त्या खास अंधेरीच्या राजाची कार्यकर्त्या म्हणून सेवा करण्यासाठी येथे आल्या असून त्या लहानपणापासून अंधेरीच्या राजाच्या भक्त आहेत अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सह खजिनदार सचिन नायक यांनी दिली. अंधेरीच्या राजाच्या आकर्षक पेहरावाबरोबरच अंधेरीच्या राजाला समितीकडे असलेल्या ३ किलो आणि सुमारे १.२५ कोटी सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष केशव तोंडवळकर व सचिव विजय सावंत यांनी सांगितले. २०१४ पासून आझादनगर उत्सव समितीने अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. तोकडे कपडे, मिनी स्कर्ट व हाफ पॅन्ट घालून अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही, असे समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र घेडिया व उदय सालीयन यांनी सांगितले.”
केएचएल न्यूज ब्युरो
दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरांचे हुबेहूब देखावे साकार करणाऱ्या मुंबईतल्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीने यंदा मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केला असून ८.५ फूटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती येथे विसावली आहे. नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला दररोज हजारो गणेशभक्त महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येतात. सर्वच सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र याला अंधेरी पश्चिम आझादनगर मेट्रो स्टेशन जवळ असलेला अंधेरीचा राजा अपवाद आहे. अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन होते. यंदा अंधेरीच्या राजाचे ५४वे वर्ष आहे.
“१९६६ साली गोल्डन टोबॅको, टाटा स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीच्या कामगारांनी आझादनगर उत्सव समितीच्या माध्यमातून अंधेरीच्या राजाची स्थापना केली होती. १९७३ साली येथील आझादनगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबँको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ दे म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला आणि कारखाने परत सुरू झाले. त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते अशी माहिती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.”
“अंधेरीच्या राजाचा प्रत्येक दिवसाचा धोतर व शाल हा पेहराव अमेरिकेतील प्रसिद्ध बॉलीवूड फॅशन डिझायनर साई सुमन साकारत आहेत. यंदा त्या खास अंधेरीच्या राजाची कार्यकर्त्या म्हणून सेवा करण्यासाठी येथे आल्या असून त्या लहानपणापासून अंधेरीच्या राजाच्या भक्त आहेत अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सह खजिनदार सचिन नायक यांनी दिली. अंधेरीच्या राजाच्या आकर्षक पेहरावाबरोबरच अंधेरीच्या राजाला समितीकडे असलेल्या ३ किलो आणि सुमारे १.२५ कोटी सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष केशव तोंडवळकर व सचिव विजय सावंत यांनी सांगितले. २०१४ पासून आझादनगर उत्सव समितीने अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. तोकडे कपडे, मिनी स्कर्ट व हाफ पॅन्ट घालून अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही, असे समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र घेडिया व उदय सालीयन यांनी सांगितले.”