Details
hegdekiran17@gmail.com
“कोविड 19 या खतरनाक विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे आणि त्याच्याविरोधात जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना लाजवतील असे ८०व्या वर्षीही ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेने मुंबईतील बोरीवली पूर्व भागातील उपनगरचा राजा, या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्राचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. समूह रूग्णालयातील डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात नुकतेच एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.”