Friday, October 18, 2024
HomeArchiveओप्पो रेनो २...

ओप्पो रेनो २ झेड आणि रेनो २ एफच्या किंमतीत घट

Details

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“ओप्पो या आघाडीच्या जागतिक स्मार्टफोन ब्रँडने नुकत्याच आपल्या ओप्पो रेनो २ झेड आणि ओप्पो रेनो २ एफ या नवीन उत्पादनांवर २००० रूपयांची आकर्षक किंमत घट जाहीर केली. रेनो २ झेड आणि ओप्पो रेनो २ एफ या फोनची किंमत आधी अनुक्रमे २९,००० रूपये आणि २५,९९० रूपये होती. हे फोन आता आघाडीच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनुक्रमे २७,९९० रूपये आणि २३,९९० रूपये किंमतीत उपलब्ध आहेत.”
 
 

“या दोन नवीन फोनच्या किंमतीत घट करण्याबरोबरच ओप्पोने रेनो २ सीरिजवर अनेक ऑफर्सची घोषणाही केली. ग्राहक आता रेनो २ मालिकेतील स्मार्टफोन शून्य डाऊनपेमेंटवर बजाज फिनसर्ववरून खरेदी करू शकतात आणि आयडीएफसी फर्स्ट बँक, होम क्रेडिट किंवा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ईएमआयचे पर्यायही मिळवू शकतात. एचडीबी ग्राहक कर्जांवर १० टक्के कॅशबॅक ऑफर देत असून एचडीएफसीच्या ग्राहकांना डेबिट-क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. ओप्पो जिओच्या ग्राहकांना १९८ आणि २९९ रूपयांच्या प्लॅनवर १०० टक्के अतिरिक्त डेटाही देत आहे. त्याचबरोबर एअरटेल ग्राहकांना २४९ रूपये रिचार्जवर डबल डेटा आणि अमर्यादित कॉलिंग व इन्स्टाकॅशवर एक्स्चेंज मूल्यावर अतिरिक्त १० टक्के देत आहे. येत्या ९ डिसेंबर २०१९ पर्यंत ओप्पो सर्व्हिस सेंटर्सवर विशेष ऑफरही लागू आहे. त्यात ग्राहकांना मोफत स्क्रीनगार्ड आणि बॅककव्हर रेनो २ झेड आणि ओप्पो रेनो २ एफ या फोनच्या खरेदीवर मिळेल.”
 
 
“आपल्या प्रत्येक कार्याच्या केंद्रस्थानी ओप्पो कायमच ग्राहकांना ठेवते आणि त्यांनी सातत्याने भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम तेच दिले आहे. मग ती उत्पादने किंवा आफ्टरसेल्ससारख्या सेवा असोत. अलीकडेच आयोजित केलेल्या काऊंटरपार्ट संशोधनाने ओप्पोला आफ्टरसेल्स डिलिव्हरीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान दिले आहे. हा ब्रँड इतका वेगवान होता की, एका तासात त्याच्या ५१ टक्के समस्या सोडवण्यात आल्या.”

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content